Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
Amit Shaha News, Amit Shah in Nashik, Nashik Latest Marathi NewsSarkarnama

गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला घेणार योगाचे धडे!

जागतिक योगा दिनानिमित्त अमित शहा नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

नाशिक : जागतिक योगा दिनानिमित्त केंद्रीय (Centre) गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) हे नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. (Amit Shaha will visit nashik on world yoga day)

Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
केंद्र सरकार अजित पवारांना एव्हढे का घाबरले?

येत्या २१ जूनला योगा दिनानिमित्त देशातील ७५ निवडक ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने गृहमंत्री अमित शाह नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. (Amit Shaha Latest Marathi News)

Amit Shaha News, Amit Shah in  Nashik, Nashik Latest Marathi News
काँग्रेस नेता आता पेटलाय... मंत्री धडकले राजभवनावर

त्र्यंबकेश्‍वर येथील गुरूपीठ परिसरात गृहमंत्री अमित शहा हे योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून सुरक्षिततेचा आढावादेखील डॉ. पवार यांनी घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून याठिकाणी काय उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहिती डॉ. पवार यांनी घेत या कार्यक्रमाचे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काटेकोरपणे नियोजन करावे.

कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी अखंडित वीजपुरवठा, वेगवान इंटरनेटची सुविधा अबाधित ठेवण्यात यावी, अशा सूचना दिल्या. तसेच, यादिवशी सकाळी अमित शहा यांच्यासोबत केवळ १५० लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वॉटरप्रुफ पेंडाल बांधण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. २१ जूनला सकाळी साडेपाचपासून कार्यक्रमांना सुरवात होणार आहे.

यामध्ये साडेसहा ते सातपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांना ऑनलाइन माध्यमातून संबोधित करतील. त्यानंतर पुढील ४५ मिनिटे योगाची प्रात्यक्षिके केली जाणार आहे. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील गुरुपिठात सदगुरू मोरेदादा रुग्णालय कोनशिलेचा उद्‌घाटन सोहळा होईल.

या वेळी आमदार राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुंबईचे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक रणदीप दत्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह केंद्रीय रिर्झव पोलिस दलाचे अधिकारी देखील उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com