Nashik News: भाजप हा सत्तापिपासू; त्याने जनतेवर महागाई लादली!

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आक्रमक काँग्रेस नेत्यांच्या घोषणांनी नागरिकही सहभागी झाले.
Congress agitation at Nashik
Congress agitation at NashikSarkarnama

नाशिक : वाढत्या महागाई (Inflation) बरोबरच केंद्रातील मोदी (Narendra Modi Government) सरकारच्या धोरणांच्या विरोधात आक्रमक झालेल्या शहर काँग्रेसतर्फे (Congress) शुक्रवारी दुपारी गॅस सिलिंडरसह आंदोलन छेडण्यात आले होते. या वेळी महागाई विरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर शरद आहेर (Sharad Aher) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध नोंदविला. (Congress party agitation in nashik against Centre Government)

Congress agitation at Nashik
Yeola news: महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने वाटले फुटाणे!

वाढत्या महागाई विरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी देशभरात आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्याच्या सर्व भागासह नाशिकमध्येही पक्षातर्फे महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस भवन येथे केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन करण्यात आले.

Congress agitation at Nashik
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

या वेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, वसंत ठाकूर, सुरेश मारू, राजेंद्र बागूल, राहुल दिवे, नीलेश खैरे, हनिफ बशीर, ज्यूली डिसूझा, ईसाक कुरेशी, विजय पाटील, दिनेश निकाळे, सोमनाथ मोहिते, स्वप्नील पाटील, कैलास कडलग, किरण जाधव, अशोक शेंडगे, भरत पाटील, जावेद पठाण, अनिल बहोत, कैलास महाले, नागरगोजे सर, अरुणा आहेर, समिना पठाण, शबाना अत्तार, सिध्दार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, दिलीप गांगुर्डे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही प्रचंड वाढल्यामुळे सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त झाला असल्याचे म्हटले आहे. याशिवाय देशातील तरुण पिढी बेरोजगार होत असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना रोजगार मिळेल, अशी कोणतीही ठोस उपाययोजना केंद्र सरकारकडे नसल्यानेच तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने अगदीच घाईघाईने आणलेली अग्निपथ योजना म्हणजे युवकांचे भवितव्य अधांतरी करण्याचे काम असून, याबाबत पुनर्विचार करून ही योजना रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएस‌टी म्हणजे देशातील गोरगरीब जनतेची लुट असल्याने किमान यांचा कमीत- कमी विचार करायला हवा होता. मोदी सरकार महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना आणि जीवनावश्यक वस्तूवर लावलेला जीएसटी मागे घ्यावा, यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com