Nashik; भाजपमध्ये मोठा गोंधळ, पदवीधरचा उमेदवारच ठरेना!

काँग्रेसचे उमेदवार, आमदार डॅा. सुधीर तांबे गुरुवारी उमेदवारी दाखल करणार
Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir TambeSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) आणि टीडीएफ (TDF) पुरस्कृत उमेदवार, विद्यमान आमदार डॅा. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) उद्या (ता.12) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या उमेदवारीसाठी शेवटचा दिवस आहे, मात्र प्रत्येक निवडणुकीत प्रचंड दावे करणारा भाजप (BJP) मात्र गोंधळलेला आहे. त्यांचे उमेदवार अद्याप ठरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Congress candidate Dr. Sudhir Tambe will file nomination tommarow)

Dr. Sudhir Tambe
Congress; ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

प्रत्येक निवडणुकीत प्रचंड गाजावाजी करीत मैदानात उतरणारा, विजयाचा दावा करणारा भाजप राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मात्र पुरता गारठला आहे. उद्या (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अद्याप या पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही.

Dr. Sudhir Tambe
Hasan Mushrif : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १०) तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.

आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यांत शुभांगी भास्कर पाटील (धुळे), ॲड. जुबेर नसीर शेख (धुळे) व सोमनाथ नाना गायकवाड (नाशिक) या तिन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. नामनिर्देशनाची मुदत १२ जानेवारीपर्यंत आहे. त्यामुळे आज यासंदर्भात पक्षीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार डॅा. सुधीर तांबे यांची उमेदवारी पक्षाने 7 ऑक्टोबर, 2021ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली आहे. शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) संघटनेने त्यांना पुरस्कृत केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आत्मविश्वासाने उतरला आहे. उमेदवार तांबे यांचा प्रचंड जनसंपर्क आणि सक्रीयता त्याच्या मुळाशी आहे.

राज्यात नागपूर, आमरावती आणि कोकण या शिक्षक तर नाशिकला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. पदवीधर निवडणूकीत यंदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे जुनी मतदारयादी रद्द झाली आहे. नव्याने मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच मतदारांची संख्या घटली. त्यात देखील एरव्ही आघाडीवर असणारा नाशिक मागे पडला आहे. यंदा सर्वाधीक मतदार नगरचे आहेत. त्यामुळे निवडणुक निकालावर देखील नगर व नाशिकचाच वरचष्मा राहील असे चित्र आहे.

अशा स्थिती भाजपचे धनंजय विसपुते आणि शुभांगी पाटील या उमेदवारांनी भाजपचे उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे. याशिवाय धुळ्याचे श्री. विसपुते यांचे नाव देखील चर्चेत आहे. यामध्ये उमेदवारी कोणाला मिळते याबाबत मात्र भाजपमध्ये गोंधळाचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in