भाजप म्हणजे अफवा फैलविणारे खाते आहे!

आमदार किशोर पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधकांना उत्तर.
Gulabrao Patil & MLA kishore Patil
Gulabrao Patil & MLA kishore PatilSarkarnama

पाचोरा : सध्या सुशिक्षित बेरोजगार राजकारणी वाढत असून, त्यांना कोणताही उद्योग दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यात भाजप म्हणजे अफवा फैलविणारे खाते आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी केले.

Gulabrao Patil & MLA kishore Patil
पंकजा मुंडेंचा टोमणा; कार्यक्रमात फक्त पंतप्रधान आणि मुंडे यांचाच फोटो शोभतो!

आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय दिले, असे म्हणणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांचे डोळे फुटले आहेत काय? जबाबदार खासदारांना हे शोभेत नाही. आपण दोन वर्षांत काय काम केले, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन गेल्यावेळी जलसंपदामंत्री असताना, त्यांनी काय बोंब पाडली? इंधन दरवाढीवर न बोलणाऱ्या भाजपवाल्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी खरमरीत टीका केली.

Gulabrao Patil & MLA kishore Patil
धुळे कचरा भ्रष्टाचार; भाजपचे ५२ पैकी ४७ नगरसेवक तुरुंगात जातील!

पालकमंत्री पाटील म्हणाले, की विरोधक टीका करतात, त्यांना उत्तर देण्याइतपत त्यांची लायकी नाही. आम्ही कामामुळेच सत्तेत आहोत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. माजी मंत्री व जबाबदार खासदार काहीही बोलतात. जनतेची दिशाभूल करतात. जनता इतकी खुळी नाही. भाजपने अफवा खाते बंद करावे आणि लोकांच्या कामाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना आम्ही काय दिले याचा पुरेपूर हिशोब देतो. समोर या, आपली काय बोंब पडली ते ही सांगा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवस १ नोव्हेंबरला असला, तरी ३१ ऑक्टोबरच्या सकाळपासून सुरू झालेले विविध कार्यक्रम एक नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यात विकासकामांचे उद्‌घाटन, लोकार्पण, फलक अनावरण, मोकळ्या जागांचा विकास भूमिपूजन, रस्ते, गटारी, सभागृह कामाचे भूमिपूजन, असे कार्यक्रम शहराच्या सर्वच भागांत झाले. रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्‍यांची आतषबाजी करत केक कापून आमदार पाटील यांचा वाढदिवस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साजरा केला.

(कै.) के. एम. बापू पाटील भाजी मंडई संकुलात नागरी अभिष्टचिंतन सोहळा झाला. यावेळी संपर्कमंत्री संजय सावंत, सुनील पाटील, डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, रावसाहेब पाटील, पद्मसिंह पाटील, उद्धव मराठे, मुकुंद बिल्दीकर, दीपकसिंग राजपूत, नगराध्यक्ष संजय गोहिल, ॲड. दिनकर देवरे, शरद पाटील, बंडू चौधरी, रवी केसवानी, रमेश बाफना, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com