धुळ्यात राष्ट्रवादीला धक्का; भाजपचे निर्विवाद यश

Gram Panchayat Election : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले.
BJP
BJP Sarkarnama

धुळे : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात भाजपने (BJP) निर्विवाद यश संपादित केले. धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे (Grampanchayat Election) निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये 33 पैकी 32 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

BJP
Grampanchayat Election : आंबेगावात १४ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले; मात्र शिंदे गटानेही खाते उघडले

राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज होत आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातील तब्बल 32 जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोर उमटवली आहे.

BJP
Grampanchyat Election : परभणी जिल्ह्यात ना भाजप, ना शिंदेसेना ; काॅंग्रेस-राष्ट्रवादीची बाजी..

शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी रिमझिम पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रामपंचायत निकालात भाजपने सुरवातीपासून आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर शेवटपर्यंत भाजपने सर्वच जागा जिंकून राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com