भाजपच्या नेत्यांनी धुळे शहरातील विकासकामे रोखली

आमदार फारुक शाह यांनी धुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर आरोप केले.
MLA Farukh Shaikh
MLA Farukh ShaikhSarkarnama

धुळे : शहरातील (Dhule) देवपूरसह इतर वसाहतींमधील रस्त्यांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, महापालिकेच्या (Municipla corporation) अखत्यारीत असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी धुळे महापालिकेने अद्यापही ‘ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, अशी माहिती आमदार फारुक शाह (Faruk Shaha) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MLA Farukh Shaikh
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गावे सक्षम करू!

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात धुळे शहरातील विकास कामांसाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद झाल्याचेही श्री. शाह म्हणाले.

आमदार श्री. शाह यांनी शनिवारी दुपारी बाराला येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की आमदार शाह म्हणाले, की धुळे शहरातील विकास कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ४५ कोटी रुपये निधीची तरतूद झाली असल्याचेही आमदार श्री. शाह म्हणाले.

MLA Farukh Shaikh
आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी मिळवले ३६ कोटी

चक्करबर्डी परिसरातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील रस्ते काँक्रिटीकरण, पाण्याची टाकी व इतर कामांसाठी २० कोटी, आरटीओ कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी १२ कोटी, हाजी अन्वर मार्गासाठी चार कोटी ७५ लाख, मोहाडी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यासाठी दोन कोटीचा निधी आहे.

याशिवाय पुढील कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये एसएसव्हीपीएस महाविद्यालय ते मोठ्या पुलापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटी, वडजाई रोड काँक्रिटीकरणासाठी सात कोटी, साक्रीरोडसाठी दोन कोटी, चाळीसगाव रोड चौफुली ते लोकमान्य हॉस्पिटल रस्त्यासाठी तीन कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले, ही कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच पोलिस वसाहतीमधील रस्ते, गटार व शहीद स्मारकासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. मूलभूत सोयी सुविधांतर्गत एक कोटी ८० लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, प्रक्रियेअंती प्रत्यक्ष काम सुरवात होईल, असे श्री. शाह यांनी सांगितले.

मूर्ती काढण्याची होती तयारी

आपण आमदार झालो नसतो तर शहरातील पांझरा नदीवर झुलता पूल तयारच झाला नसता. मी आमदार झाल्यानंतर या पुलाच्या कामासाठी निधी आणला. थोडेफार काम बाकी असेल तर माझ्या स्थानिक निधीतून ते करून देईन. दरम्यान, भारतीय जनता पक्ष तर या पुलावरील भगवान शंकराची मूर्ती काढण्याच्या तयारीत होता, असा आरोपही आमदार श्री. शाह यांनी पत्रकार परिषदेत केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com