हिंमत असेल तर शिवसेना सोडली हे जाहीर करा!

भाजपने मुंबई महाराष्ट्रापासून तोडता यावी यासाठी शिवसेना संपविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्षाला (BJP) महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करायची आहे. शिवसेना (Shivsena) आहे, तोपर्यंत ते शक्य होणार नाही. त्यामुळे भाजपला शिवसेना संपवायची आहे. चाळीस आमदार फोडण्याचे पाप त्यांनी त्यासाठीच केले आहे. हे चाळीस भोंगे सध्या रोज नवी कारणे सांगत आहेत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (BJP had a conspiracy to divide maharashtra in three division)

Sanjay Raut
चंद्रकांतदादांचा पेढा एकनाथ खडसेंनीही मग गोड मानून घेतला...

खासदार राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. शहरातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, अजय बोरस्ते आदींसह शहर-जिल्ह्यातील पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

Sanjay Raut
आघाडीचा एक उमेदवार पडणार; चंद्रकांतदादांचा निशाणा कुणावर?

खासदार राऊत म्हणाले, शिवसेनेचे बंडखोर आपल्या कृत्याची रोज नवी कारणे देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी भाजपच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची व मुंबई स्वतंत्र करण्याच्या कारस्थानावर भूमिका जाहीर करावी. आम्ही शिवसेना सोडली हे सांगण्याची हिंमत दाखवावी. कारण ते ज्या दिवशी ते सांगतील, त्याच दिवशी ते अपात्र ठरून त्यांची आमदारकी जाईल. त्यामुळे त्यांचे बहाणे सुरु असल्याचे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, की शिवसेनेतून फुटलेल्या प्रत्येकाकडून वेगवेगळे कारण सांगितले जात आहे. काहींच्या म्हणण्यानुसार शिवसेनेने हिंदुत्व सोडले, राष्ट्रवादीकडून अडवणूक होते, तर काही जण काम होत नसल्याचे सांगतात. प्रत्येक जण वेगवेगळे कारण देत आहे. पण खरं कारण एकच आहे. भाजपला शिवसेना फोडायची आहे. शिवसेना संपल्याशिवाय त्यांना सत्ता मिळणार नाही. भाजपला शिवसेनेवर कब्जा करायचा आहे. त्यामुळे शिवसेना सोडणाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राज्यातील जनता अत्यंत जागरूक, हुशार आणि चाणाक्ष आहे. राज्यात जे घडले त्याचे काय परिणाम होणार हे सगळ्यांना लवकरच दिसून येईल.

खासदार राऊत म्हणाले, की शिवसेना शहरातील असो की जिल्ह्यातील ती जागेवरच आहे. काही लोक गेले असले, तरी त्यांच्यासोबत शिवसेना गेलेली नाही. मालेगाव-नांदगाव मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक मला भेटत आहेत. शिवसेनेत नवीन लोक येत आहेत. नाशिक शहर-जिल्हा कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे. महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल.

सरकार बेकायदेशीर

राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. आमदार अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांनी परस्पर भूमिका घेत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेत राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन केले आहे. सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले आमदार म्हणतात, की शिवसेना आमची आहे, ‘मातोश्री’ आमची आहे. चिन्ह आमचे, पक्ष आमचा असं सगळं सुरू आहे. तुमच्यात धमक असेल, तर तुम्ही तुमचे चिन्ह, पक्ष निर्माण करा, असे आव्हान राऊत यांनी बंडखोरांना दिले.

भाजपला मिळाले नवीन ४० भोंगे

खासदार राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात जो धुरळा उडाला आहे, मात्र त्यावर पाऊस पडला आहे. शहरातील सगळे नगरसेवक माझ्यासोबत आहेत. शहर आणि ग्रामीणच्या बैठका सुरू आहेत. शिवसेना जागच्या जागी आहे. भाजपने माझ्यावर बोलणं थांबवलं आहे. कारण त्यांना नवीन ४० भोंगे मिळाले आहेत. धनुष्य हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेकडेच राहणार, असा दावाही त्यांनी केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com