BJP; शिंदे गटाला जोर का झटका; नाशिक मतदारसंघात भाजपची तयारी सुरु!

भाजपच्या मिशन २०२४ अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत ‘एन्ट्री’
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

नाशिक : केंद्रीय (Centre minister of stste) आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्याकडे नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची (BJP) स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे. पक्षबांधणीच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी होणार आहे. हा शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यासाठी मोठा धक्का आहे. (BJP starts it`s own in Nashik Loksabha constituency is Big Shock for Eknath Shinde group in Nashik)

Dr. Bharti Pawar
Arvind Sawant : आजारपणावर केलेली टीका न शोभणारी; अरविंद सांवतांनी राज ठाकरेंना सुनावले

भाजप व शिवसेनेची युती असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला येत होता. २०१४ व २०१९ च्या लोकसभा दोन्ही पक्षांनी युतीत लढल्या. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिवसेना युती तुटली.

Dr. Bharti Pawar
MPSC; सुखद; अवघ्या चार तासांत `एमपीएससी`ची गुणवत्तायादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार बरोबर घेऊन भाजपसमवेत सरकार स्थापन केले. भाजपने राज्यात प्रामुख्याने स्वबळाचा नारा देत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. या नियोजनात नाशिक नव्हते. मात्र आता नाशिकला स्वबळाची तयारी भाजपने सुरु केल्याने खासदार गोडसे यांच्यावर आपल्या निर्णयामुळे पश्चातापाची वेळ येणार हे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय मंत्र्यांची देशभरात लोकसभा प्रवास योजना सुरू आहे. पक्षबांधणीसाठी त्याचा उपयोग होत आहे. त्या धर्तीवर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या १७ लोकसभा मतदारसंघांत प्रवास दौऱ्यांची आखणी करण्यात आली आहे. त्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील. पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर-पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर व मावळ, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी व धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com