संजय पवारांचे शिवसेना, भाजप अन् राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे वर्तुळ पूर्ण!

माजी आमदार संजय पवार यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार बळकटी
Chhagan Bhujbal & Ex MLA Sanjay Pawar

Chhagan Bhujbal & Ex MLA Sanjay Pawar

Sarkarnama

नांदगाव : नांदगावचे भाजपचे माजी आमदार संजय पवार (Sanjay Pawar) यांनी अखेर अधिकृतरीत्या राष्ट्र्वादी कॉंग्रेसमधील पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. यामुळे नाजूक अवस्थेतील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal &amp; Ex MLA Sanjay Pawar</p></div>
अजित पवारांच्या जळगाव दौऱ्याने राष्ट्रवादीला अच्छे दिन!

हाडाचा शिवसैनिक म्हणून आक्रमक शैलीच्या मूळच्या शिवसैनिक म्हणून जनतेला भावणारा लोकप्रतिनिधी दिसला. परिणामी, सुरवातीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत त्यांची एंट्री झाली. मात्र, २००९ च्या विधानसभेत ७८ हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या संजय पवार यांचा पंकज भुजबळांनी पराभव केला. तेव्हापासून मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांना आकार प्राप्त झाला. तेव्हापासून ते आजतागायत स्थानिक भूमिपुत्रांची मोट बांधण्याचे अनेक प्रयोग मधल्या काळात झाले. मात्र, अशा ध्रुवीकरणाच्या प्रयोगांना फारसे यश आलेले नव्हते. शिवसेना, राष्ट्रवादी, पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेना अशा प्रवेशाचे वर्तुळ पूर्ण करू पाहणाऱ्या माजी आमदार संजय पवार यांना भाजपमध्ये आणण्यासाठी तत्कालीन खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचे प्रयत्न यशस्वी ठरले होते.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal &amp; Ex MLA Sanjay Pawar</p></div>
या ड्रग्ज तस्करीपुढे ‘कार्डिलिया क्रूज’, आर्यन खान प्रकरण किरकोळ!

त्यांच्याच पुढाकारातून २३ ऑक्टोबर २०१६ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील उत्तर महाराष्ट्र विभागातील कार्यकारिणीच्या बैठकीवेळी त्यांनी हा प्रवेश केला होता. खरे तर संजय पवार यांची भाजपमधील एंट्री मुळातच विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून झालेली होती. त्यासाठी पवारांनी आपली राजकीय पत पणाला लावत जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी भाजपला चांगले यश मिळवून दिले. मात्र, दोन वर्षापूर्वी विधानसभेत भाजप- शिवसेना युती झाल्याने नांदगाव मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यातच भाजपला सर्व काही मिळवून देणाऱ्या पवार यांचे राजकीय पुनर्वसन काही करता आले नाही. ‘भाजपमुळे आपण नाही आपल्यामुळे भाजप’ अशी भावना झालेल्या पवारांनी पुन्हा एकदा भुजबळ कॅम्पस जवळ केला.

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश

आता संभाव्य जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार संजय पवार पुन्हा एकदा डेरेदाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक सध्याची अवस्था अतिशय नाजूक अवस्थेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर संजय पवारांच्या प्रवेशाने बळकटी मिळू शकते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com