मी मंजूर केलेली कामे देखील भाजपला करता आली नाही!

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील सात वर्षांचा ‘बॅकलॉग’ भरून काढणार असल्याचे सांगितले.
मी मंजूर केलेली कामे देखील भाजपला करता आली नाही!
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : २०१४ पूर्वी आम्ही सत्तेत असताना मंजूर केलेल्या विकासकामांच्या प्रकल्पाकडे मागील सरकारने (BJP Government) पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे कामे रखडली. मात्र आता ७ वर्षांचा बॅकलॉग (Backlog) भरून काढत जिल्ह्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत ते मार्गी लावणार असून, त्यासंदर्भात सर्व विभागांना सूचना दिल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
हिंदू मित्राच्या मुलीचे मुस्लिम दांपत्याकडून कन्यादान!

जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठक पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

श्री. भुजबळ यांनी सांगितले, की जिल्ह्यातील विमानतळाचा विकास, कृर्षी टर्मिनल, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, कलाग्राम, अंजनेरी ट्रेकिंग इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रेंद, दादासाहेब फाळके चित्रसृष्टी असे विविध विकासकामे जिल्ह्यात २०१४ पूर्वी सत्तेत असताना मंजूर केली. मात्र त्यानंतर सत्ताबदल झाला. त्या सरकारने या कामांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. २०१९ नंतर सत्तेत आल्यानंतर दोन वर्ष ही कोरोना महामारीत वाया गेली. मात्र आता पुन्हा ही प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आढावा घेऊन ते पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळांचा टोला, खासदार राणा मागासवर्गीय आहेत?

त्यानुसार अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे ट्रेकिंग इन्स्टिट्यूटसाठी एक कोटी ६० लाख रुपयांचा निधी आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा विभाग यांनी मार्गी लावून तो पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी टर्मिनलसाठी सिद्ध प्रिंपी येथे १०० एकर जागा आहे. मात्र त्याठिकाणी जागेच्या आरक्षणाचा प्रश्‍न असून, तो सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामाच्या ठिकाणी अनेक खड्डे आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी कामात त्याचा अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तेही कामे लवकर मार्गी लागेल. यासंदर्भातील कागदपत्रांची काही कामे रखडली असून, ती पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी विभागांना श्री. भुजबळ यांनी दिल्या.

इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी ५४ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र ते काम सुरू न झाल्याने तो पैसा पुन्हा शासनाकडे जमा झाला. मात्र, आता पुन्हा नव्याने या कामांची प्रशासकीय मान्यता घेऊन ते मार्गी लावले जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रेंददेखील सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. पुढील पंधरा दिवसांत याचे भूमिपूजन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

चित्रसृष्टीसाठी पर्यटनमंत्र्यांकडे बैठक

मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे दादासाहेब फाळके चित्रसृष्टी उभारण्यासाठी १०० एकर जागा देण्यात आली. मात्र अद्याप ती तयार झालेली नाही. याबाबत असलेल्या ग्रामपंचायतींच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच गोरेगाव (मुंबई) येथील चित्रपटनगरी किंवा हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर याचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल. यांसह कलाग्रामच्या प्रश्नांसंदर्भातदेखील पर्यटनमंत्री यांच्याकडे बैठक लावली जाणार आहे.

या वेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह विविध खात्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.