भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांची गळा चिरून हत्या

युनियन स्थापन करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हत्या
Amol Ighe, BJP
Amol Ighe, BJPSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष अमोल ईघे (Amol Ighe) यांची आज सकाळी तीक्ष्ण हत्यारांनी वार करून तसेच गळा चिरून हत्या करण्यात आली. एका कंपनीत युनियन स्थापन करण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. ईघे यांचे काही सहकारी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. या वादातूनच ही हत्या झाल्याचा आरोप होत आहे.

Amol Ighe, BJP
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण म्हणजे, कोंबडया वाचविण्यासाठी माणसं मारणे

आज सकाळी सातपूर गावातील म्हसोबा मंदिराजवळ भाजपचे विभागीय अध्यक्ष अमोल ईघे यांच्यावर हल्ला झाला. गेले आठवडाभर ते औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामगार संघटना स्थापन केली होती. त्यात दोन गट पडले. त्यामुळे एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीची युनियन केली होती. त्यात एकाला निलंबित करण्यात आले. यातील त्यांचेच काही सहकारी व राजकीय कार्यकर्ते देखील होते. त्यांच्यात यावरून वाद सुरु होता. सकाळी श्री. ईघे कंपनीच्या कामगारांना भेटण्यासाठी निघाले असता, यातील काही सहकाऱ्यांशी त्यांची भेट झाली. त्यात चर्चेतून वाद झाला. वादाचे पर्यावसान त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाला. एकाने त्यांचा गळा चिरल्याने ते जखमी अवस्थेत मंदिराजवळ पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. श्री. ईघे यांना कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात केले असता त्यांना मयत घोषीत करण्यात आले.

Amol Ighe, BJP
ठाकरे सरकारचा एक पैसाही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही, तो कुणाच्या खीशात गेला?

या घटनेनंतर भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक दिनकर पाटील, महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, हिमगौरी आडके, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शंभू बागूल, विजय साने, मुकेश शहाने यांसह विविध नगरसेवकांनी सकाळ पासून पोलिस ठाण्यासमोर धरणे धरले.

दरम्यान शहरात या आठवड्यातील ही तिसरी हत्या आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या हत्येने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत संतापाचे वातावरण आहे. त्यांनी याबाबत पोलिस निष्क्रीय आहेत. दोषींना तातडीने अटक न केल्यास प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करण्यात यावी. पोलकमंत्र्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. परस्परांतील वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. म्हसरूळ येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या मैदानात हा प्रकार घडला होता. पूजा आंबेकर या महिलेची देखील हत्या झाली होती. ही महिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पदाधिकारी होती. काही दिवसांपूर्वीच जामीनावर सुटलेला मखमलाबाद येथील युवकाची देखील त्याच्याच सहकाऱ्यांनी हत्या केली होती. महिनाभरात चार जणांची हत्या झाल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com