राज्यातील दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी

कार्यकर्त्यांवरील पुर्वग्रहदुषित कारवाई थांबविण्याची भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी
राज्यातील दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी
Malegaon Bjp leaders given memorandum to TahsildarSarkarnama

मालेगाव : मालेगावसह अमरावती व नांदेड येथील हिंसाचाराचा येथील भाजपने निषेध केला आहे. अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकावून दंगल घडविण्याच्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुरेश निकम, महापालिका गटनेते सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष निलेश कचवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसिलदारांना निवेदन दिले.

Malegaon Bjp leaders given memorandum to Tahsildar
काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार

मालेगाव, अमरावती व नांदेड येथील हिंसाचाराची सखोल चौकशी करावी, भाजपनेते व कार्यकर्त्यांवरील पुर्वग्रहदुषित कारवाई थांबवावी, वरील तीनही शहरांमध्ये जमावाने रस्त्यावर उतरुन दगडफेक केली. दुकान, कार्यालय यांची नासधूस केली. अमरावतीत संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरीकांवर हल्ले करण्यात आले. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पोलिस पाठीशी घालीत आहेत. सामान्य नागरिकांना मात्र पोलिस त्रस्त करत आहेत.

Malegaon Bjp leaders given memorandum to Tahsildar
आगामी महापालिका निवडणुक भाजप विकासाच्या मुद्दयावरच लढणार!

दंगल घडविणाऱ्या सुत्रधार व त्याच्या समर्थकांना तत्काळ अटक करावी, स्वरंक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भाजप नेते व कार्यकर्त्यांवरील पुर्वग्रहदुषित कारवाई थांबवावी, त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, रझा अकॅडमीवर बंदी घालावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या वेळी दीपक पवार, नितीन पोफळे, संजय जाधव, संजय निकम, दीपक देसले, संजय काळे, राजेंद्र शेलार, लकी गील, उमाकांत कदम, हरिप्रसाद गुप्ता, दादा जाधव, राजेंद्र शेलार, जयप्रकाश पठाडे, सुधीर जाधव, अरुण पाटील, नाना मराठे, सुनील शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in