मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी!

वाझे, शर्मा यांच्या संबंधाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी भाजपाचे केशव उपाध्ये यांनी केली.
BJP Spoaks person Keshav Upadhey
BJP Spoaks person Keshav UpadheySarkarnama

मुंबई : उद्योगपती अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) याचा सहभाग असल्याचा व त्यासाठी सचिन वाझे (Sachin Waze) याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhey) यांनी केली.

BJP Spoaks person Keshav Upadhey
आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. श्री. उपाध्ये म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी.

BJP Spoaks person Keshav Upadhey
डाॅ. भारती पवार म्हणाल्या, `मविप्र` संस्थेने मला घडवले!

श्री. उपाध्ये म्हणाले की “सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधिमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला ४५ लाखांची सुपारी दिली. या कटाची आखणी पोलीस आयुक्तालयात झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

ते म्हणाले, सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यातच, हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी श्री. उपाध्ये यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या व अन्य नेत्यांवर सुपारीबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचे उत्तर द्यावे. याच वाझेचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला होता. या गुन्हेगारांसोबतचे लागेबांधे संशयास्पद आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com