भाजप म्हणते, नवाब मलिक आरोप करण्यात व्यस्त, त्यांच्या खात्यासाठी कर्तव्यदक्ष मंत्री द्या!

आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक समाजासाठीच्या विकास योजनांना खीळ बसली आहे.
NCP leader Nawab Malik
NCP leader Nawab MalikSarkarnama

नाशिक : आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याक समाजासाठीच्या विकास योजनांना खीळ बसली आहे. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित न झाल्यामुळे विद्यार्थी व महिला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अल्पसंख्याक खात्याचा कारभार पाहणारे नवाब मलिक यांना या खात्याच्या कामकाजाकडे लक्ष देण्यास सवड नसल्याने या खात्यासाठी कर्तव्यदक्ष मंत्री नियुक्त करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

NCP leader Nawab Malik
पालकमंत्री भुजबळ- आमदार कांदे वादामुळे बैठक नाशिकला अन् निर्णय होणार मुंबईला!

श्री. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आघाडी सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे होत आले तरी अल्पसंख्याक आयोगाचे गठन झालेले नाही. अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाजही संचालकांच्या नियुक्त्या नसल्याने ठप्प झाले आहे. परिणामी या महामंडळाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ महिला, विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही. हज समिती स्थापन न केल्यामुळे हज यात्रेकरूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक हे या खात्याच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी या खात्याला न्याय देणारा कर्तव्यदक्ष मंत्री नियुक्त केला जावा.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com