भाजप नेत्यांनीच उघड केला धुळ्यातील भ्रष्टाचाराचा धक्कादायक‘जळगाव पॅटर्न’

भाजपने धुळे महापालिकेची तिजोरीच रिकामी केल्याचा सत्ताधारी भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांचा आरोप
BJP Flags
BJP FlagsSarkarnama

धुळे : घनकचरा संकलनाच्या कामासाठी नियुक्त बचतगटाला बिल मिळाल्यानंतर टक्केवारी काढून महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आरोग्याधिकाऱ्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यात येत होते. धुळे महापालिकेत हा भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ (Jalgaon patteurne) असल्याचा गंभीर आरोप करत याबाबत संबंधितांचे बँक डिटेल्स मागवा, अशी मागणी करीत नगरसेवक नागसेन बोरसे (Nagsen Borase) यांनी आपल्याच सत्ताधारी भाजपला अडचणीत आणले.

BJP Flags
मुका बाप कॅन्‍सरग्रस्‍त मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडतो तेव्हा...

विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ब्रेक लागलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी महापालिका सभागृहात झाली. सभापती जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. या सभेत प्रभाग क्रमांक १५ मधील सार्वजनिक शौचालये विविध संस्थांना देखभाल-दुरुस्तीसाठी दिली होती. मात्र, संबंधित संस्थांबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने संबंधित नियुक्त संस्थांकडून शौचालये देखभाल-दुरुस्तीचे काम काढून मे. जमुना बहुद्देशीय संस्थेला देण्याबाबतचा विषय सभेपुढे होता. या विषयाच्या अनुषंगाने सदस्य श्री. बोरसे यांनी या जमुना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किंवा प्रमुख कोण, असा प्रश्‍न प्रशासनाला केला. त्यावर सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी पवन रत्नाकर बाविस्कर असे नाव सांगितले. हाच धागा पकडून श्री. बोरसे यांनी पवन बाविस्कर अर्थात पवन माळी असे त्यांचे नाव असल्याचे म्हणत पवन बाविस्कर (माळी) यांचे वडील महापालिकेत सहाय्यक आरोग्याधिकारी होते, असे सांगितले.

BJP Flags
भाजपचा आजचा मोर्चा प्रचारला साजेशा होणार की?...

बँक डिटेल्स मागवा

श्री. बोरसे म्हणाले, की यापूर्वी महापालिकेत बचतगटांच्या माध्यमातून घनकचरा संकलनाचे काम केले जात होते. यात आदित्य महिला बचतगटही होता. या बचतगटाला कामाचे बिल मिळाल्यानंतर टक्केवारी काढून पैसे पवन माळी यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जात होते. भ्रष्टाचाराचा हा जळगाव पॅटर्न धुळे महापालिकेत घडल्याचे श्री. बोरसे म्हणाले. या भ्रष्टाचारासाठी पदाचा दुरुपयोग केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात आपण बँकेकडे माहिती मागितली, मात्र बँकेने अशी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेने बँकेकडून याबाबत सविस्तर मागवावी, अशी मागणी श्री. बोरसे यांनी केली. या बँक डिटेल्समधून सर्वकाही समोर येईल, असा त्यांचा रोख होता. दरम्यान, शौचालय देखभाल-दुरुस्तीचे काम मे. जमुना बहुउद्देशीय संस्थेला देण्याचा विषय मंजूर झाला.

...तर राजीनामा देतो

स्थायी समिती सभेत एका विषयावर चर्चेदरम्यान श्री. बोरसे यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारे तरतूद नसताना काही कंत्राटदारांना बिले दिली गेली. ही रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल पाच-सहा कोटी रुपये असल्याचे ते म्हणाले. यावर अतिरिक्त आयुक्त कापडणीस यांनी तरतूद नसेल असे होणार नाही असे म्हटले, त्यावर श्री. बोरसे यांनी तरतूद दाखविली तर माझा राजीनामा देईन, असे थेट आव्हानच दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com