Ahmednagar News: भर सभेत भाजप-शिवसेना नगरसेवक भिडले; नगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा

BJP vs Shivsena : दोघांमध्ये हमरातुमरी होऊन थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत वाद झाला.
BJP vs Shivsena
BJP vs ShivsenaSarkarnama

Political News : अहमदनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नगरसेवक भिडल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे मनोज कोतकर आणि ठाकरे गटाचे सचिन शिंदे यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.

यानंतर दोघांमध्ये हमरातुमरी होऊन थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत वाद झाला. पण यावेळी तेथे उपस्थित असलेल्या इतर नागरसेवकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.

BJP vs Shivsena
Ahmednagar News: अहमदनगर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग; कुणाची वर्णी लागणार?

नेमकं काय घडलं?

अहमदनगर शहरामधील विविध विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिकेने आज सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. ही सर्वसाधारण सभा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. यावेळी शहरातील विविध प्रश्नांवरून नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी शहरातील पाणी, कचरा आणि लाईट यासह विविध प्रश्नावर नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर हे आपल्या प्रभागातील प्रश्नांबाबद बोलण्यासाठी उभे राहिले. पण याचवेळी ठाकरे गटाचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी महापौरांना विनंती केली की या सभेत पत्रिकेवरील विषय घेण्यात यावे.

BJP vs Shivsena
Ahmednagar News : श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदासाठी संचालकांचे गुडघ्याला बाशिंग; अनेकांनी लावली फिल्डींग?

यानंतर मनोज कोतकर हे काहीसे आक्रमक होत म्हणाले की, आम्हाला प्रभागातील विषयांबाबत बोलू द्यायचं नसेल तर सर्वसाधारण सभा का ठेवली? असं म्हणत त्यांनी नगरसेवक शिंदेंना सुनावलं.

यानंतर या दोघांमध्ये हमरातुमरी होऊन थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत वाद झाला. यावेळी एकमेकांना बघून घेऊ, अशी धमकी एकमेकांना दोघांकडून देण्यात आली. मात्र, इतर नगरसेवकांनी मध्यस्‍थी करत हा वाद मिटवला. दरम्यान, या वादामुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in