एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपने बाजार समित्यांची विधानसभा केली!

आता आमदारांना बाजार समित्यांच्या राजकारणातही सक्रीय व्हावे लागणार.
Devidas Pingle News, Dilip Bankar News, Nashik News
Devidas Pingle News, Dilip Bankar News, Nashik NewsSarkarnama

नाशिक : सहकार कायद्यान्वये (Co-operative) अस्तित्वात आलेल्या बाजार समित्या (APMC) या शेतमाल विनिमयाच्या प्रतिनिधीक संघटना आहेत. आता त्यात दहा गुंठे शेती असलेला प्रत्येक शेतकरी (Farmers) मतदान करणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका राजकीय नेते व आमदारांची परीक्षा घेत त्यांची राजकीय दमछाक करणाऱ्या ठरतील. (APMC Elections will now may be mini Assembly election)

Devidas Pingle News, Dilip Bankar News, Nashik News
सत्तांतरानंतरही नाशिकमध्ये भुजबळांचेच ग्लॅमर अन् रुबाब!

ग्रामीण राजकारणाची घडी विस्कटवणारा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडून भाजपने आपला अजेंडा राबविला आहे. यानिमित्ताने राज्यातील अनेक तालुक्यांत बाजार समित्या यापुढे राजकारणाचा आखाडा ठरतली. नाशिक जिल्ह्यात नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा या बाजार समित्यांतून त्याचे चित्र लवकरच दिसेल. पिंपळगाव बसवंत बाजार समितीची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे.(Nashik latest Marathi News)

Devidas Pingle News, Dilip Bankar News, Nashik News
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

किमान दहा गुठे शेती नावावर असलेले शेतीमाल विक्री करणारे शेतकरी बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदार असतील. या निर्णयाचा परिणाम येत्या चार महिन्यात होऊ घातलेल्या नाशिक, पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत दिसेल. पिंपळगावला सुमारे ४० हजार मतदार असू शकतात. विद्यमान अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यात ही लढत रंगेल. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असेल.

यापुर्वी बाजार समित्यांना पोरतिनिधीक मतदान होते. ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक त्यात मतदान करीत असत. त्यात या सदस्यांना खुपच भाव होता. आता त्यांच्या पदाचे ते महत्त्व कमी झाले आहे. या सिलेक्टीव्ह मतदारांना आपला अधिकार गमावल्याचे दुःख नक्की होणार. त्यातून राज्य सरकारवरचा त्यांचा राग वाढणार हे नक्की.

राज्यातील व देशातील सहकार क्षेत्रावर अद्यापही भाजपला नियंत्रण मिळवता आलेले नाही, ही त्यांची सल आहे. त्यादृष्टीने अतिशय नियोजनपुर्वक त्यांनी केंद्रात सहकार खात्याचा स्वतंत्र मंत्री केला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रावर अपवाद वगळता दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्याचा उपयोग हे पक्ष राजकारणात प्रभावासाठी करतात. त्याची भाजपला चिंता वाटते.

त्यादृष्टीने त्यांनी दहा गुंठे शेती असलेला व शेतमाल विक्री करणाऱ्यांना मतदार केले आहे. याचे स्वागत आणि विरोध दोन्ही होत आहे. प्रस्थापीत त्याचा विरोध करतात. नवे मतदार आणि विस्थापीत त्याचे स्वागत करतात. यामध्ये भाजपला आपला शिरकाव होईल. ग्रामीण राजकारणात स्थान बळकट होईल अशी अपेक्षा वाटते. यानिमित्ताने बाजार समित्यांची विधानसभा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपने करून घेतला आहे. यात चाळीस बंडखोर आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातही विचका होऊ शकतो हे लवकरच सगळ्यांच्या लक्षात येईल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in