BJP News; `लव्ह जिहाद` नंतर सुरु झाले `लँड जिहाद`!

धुळे शहरात विशिष्ट समाजाकडून होणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात भाजपने मोर्चा काढला
BJP Morcha at Dhule
BJP Morcha at DhuleSarkarnama

धुळे : `लव्ह जिहाद` नंतर आता महापालिकेतील (Dhule) सत्ताधारी भाजपने (BJP) `लँड जिहाद` सुरु असल्याचा आरोप केला आहे. विशिष्ट समाजातील नेते शहरात अतिक्रमण (Encroachment) करत आहेत याला लँड जिहाद असे संबोधत भाजपने बुधवारी जिल्हाधिकारी (Collector Office) कार्यालयावर मोर्चा नेला. या प्रकाराला आळा घाला, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. (BJP deemands action against Illegal Encroachment in the city)

BJP Morcha at Dhule
Pune : "त्यांचे अन् माझे विचार एकच, आता त्यांना भेटून ओळख वाढवेन"

शहरातील प्रकाश टॉकीजपासून मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

BJP Morcha at Dhule
Congress : पटोलेंची डोकेदुखी वाढली; तांबेंच्या समर्थनार्थ पहिला राजीनामा : काँग्रेसमध्ये दोन गट

शहरातील नटराज टॉकीजशेजारील ऐंशी फुटी रोडलगत सर्व्हे क्रमांक ३८७ क मधील फायनल प्लॉट २९ मधील पोलिस ठाण्याच्या जागेवरील अतिक्रमण काढल्यानंतरही त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जात असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच दहशत निर्माण करणाऱ्यांवर आळा घालून नटराज टॉकीजशेजारील आरक्षित जागेवरील अतिक्रमण काढून लवकरात लवकर तेथे पोलिस ठाणे उभारावे.

तेथील आरक्षण क्रमांक १०५ हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह जागेसाठी नवीनच तयार झालेल्या बेकायदेशीर वॉलकंपाउंडकरून एकप्रकारे शहरात लँड जिहादचा प्रकार काही विशिष्ट समाजातील नेते करू इच्छितात. त्या संदर्भात महापालिकेकडून माहिती मागविली असता त्यांनी २३ जानेवारीच्या पत्रानुसार खुलासा केला आहे, की कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता आरक्षित जागेवर वॉल कंपाउंड करण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझादनगरमधील अभय कॉलेजकडील परिसरात जवळपास २५ ते ३० हजार लोकवस्तीचा भाग आहे. त्या भागात जाण्याचा एकमेव रस्ता हा नटराज टॉकीजलगतचा आहे. त्या ठिकाणी काही समाजकंटक घोळका करून उभे राहतात. त्यात तेथील काही स्थानिक अतिक्रमण करून ज्यांनी भंगाराची दुकाने थाटली आहेत तेदेखील आहेत. या ठिकाणी महिला-भगिनींची नेहमीच छेडखानी होते. येणाऱ्या-जाणाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घालून वाद निर्माण करतात. या प्रकाराला प्रशासकीय स्तरावरून आळा घालावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com