Dhule News; भाजप नेत्यांनी अजित पवार यांचा कडेलोट केला

भाजपतर्फे आंदोलन; पदाधिकारी, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
BJP agitation in Dhule City
BJP agitation in Dhule CitySarkarnama

धुळे : छत्रपती संभाजीराजे महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपतर्फे (BJP) सोमवारी शहरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा कडेलोट आंदोलनातून निषेध केला. शहरातील (Dhule) पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून श्री. पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट केला. (BJP workers agitation against NCP leader in City)

BJP agitation in Dhule City
Jindal Fire; `जिंदाल`स्फोट व आग प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई होणारच!

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर न संबोधता स्वराज्यरक्षक असे संबोधावे, असे विधान केले होते. त्यावर स्वागत व विरोध अशा विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत. भाजपने यासंदर्भात निषेध आंदोलन केले.

BJP agitation in Dhule City
Bhagyashree Banait; मुंडेंच्या बदलीचा रेकॉर्ड मोडत बानाईत महापालिकेत रुजू

राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला. त्यांच्या वक्तव्याबद्दल भाजपतर्फे राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी धुळे शहरातही भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कडेलोट आंदोलनातून श्री. पवार यांचा निषेध केला.

भाजपचे नगरसेवक हिरामण गवळी व कार्यकर्ते यशवंत येवले यांनी मावळ्यांचा वेश परिधान करून अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून कडेलोट केला. महापौर प्रदीप कर्पे, नगरसेवक चंद्रकांत सोनार, मनपा स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले, चेतन मंडोरे, विनोद थोरात, बबन थोरात, नगरसेविका प्रतिभा चौधरी, ओम खंडेलवाल यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान श्री. पवार यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. पवार घराण्याने नेहमीच शिवाजी महाराजांचा द्वेष केला आहे. शरद पवार, अजित पवार, रोहित पवार यांच्या निषेधासाठी महाविकास आघाडी पुढे येईल का, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काय भूमिका घेईल, असा सवालही भाजपने यानिमित्ताने केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com