धुळे शहरात `एमआयएम` विरूद्ध भाजप संघर्ष पेटला

तीस कोटींच्या निधीच्या वादातून भाजपने आमदार फारूक शाह यांचा निषेध केला.
Mayor Pradeep Karpe & MLA Faruk Shah
Mayor Pradeep Karpe & MLA Faruk ShahSarkarnama

धुळे : रस्ते विकासासाठी (Road Devolopment) मिळालेल्या तीस कोटींच्या निधीतील (State government Funds) कामाला खासदारांसह (Dr. Subhash Bhamre) भाजपने (BJP) स्थगिती आणल्याने याविरोधात एमआयएमने (AIMIM) सोमवारी धिक्कार आंदोलन केले होते. त्याला प्रत्तुत्तर म्हणून भाजपने आज एमआयएमसह आमदार फारुक शाह (Faruk Shah) यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यात आमदारांच्या भूमिकेचा भाजपच्या आंदोलकांनी निषेध केला. (30 cr Fund allocation for roads are being political issue with BJP)

Mayor Pradeep Karpe & MLA Faruk Shah
वादग्रस्त बकालेंना उद्या तरी जामीन मिळेल का?

श्री. अग्रवाल यांनी तीस कोटींच्या निधीबाबत आमदार शाह यांच्यावर काही गंभीर आरोप केले. त्यांनी ठेकेदारांकडून आगावू रक्कम घेतली. त्यात आमदारांकडून चुकीच्या दर्शविलेल्या कामांना स्थगिती मिळाल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले. त्यातून थयथयाट करत त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात आंदोलन घडवून आणले. शासनाची दिशाभूल, देवपूरवासीयांची फसवणूक व अशा प्रकारातून शांतता भंग होत असल्याने आमदार शाह यांचा निषेध करत असल्याचे श्री. अग्रवाल यांनी म्हटले आहे.

Mayor Pradeep Karpe & MLA Faruk Shah
खडसेंना धक्का; भुसावळच्या नगराध्यक्षांसह ९ नगरसेवक अपात्र

आमदारांनी देवपूरमधील रस्ते विकासासाठी मंजूर ३० कोटींचा निधी अल्पसंख्याक भागाकडे वळविला. त्यांनी या भागाकडे ८० टक्के, तर देवपूरकडे २० टक्के कामे दर्शविली. यात जीआरमधील तरतुदीची भंग झाल्याने शासनाने कामांना स्थगिती दिली, असे सांगत आमदार शाह चारशे कोटींची कामे केल्याचा दावा करतात. त्यांनी ही कामे कुठे केली ते दाखवावे, असे आव्हान श्री. अग्रवाल यांनी दिले.

भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर अनिल नागमोते, स्थायी समिती सभापती शीतल नवले, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, डॉ. माधुरी बाफना, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, महिला बालकल्याण सभापती योगिता बागूल आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com