NCP News: `बिल्किस बानो`च्या गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवा!

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे धुळे येथे निषेधासाठी आंदोलन.
NCP womens agitation at Dhule
NCP womens agitation at DhuleSarkarnama

धुळे : गुजरातमधील (Gujrat) बिल्किस बानो अत्याचार (Bilkis Bano atrocity) प्रकरणातील दोषींना तुरुंगातून सोडून देण्याच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने (NCP) येथे निषेध केला. या दोषींना पुन्हा गजाआड टाकण्याच्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी अशी मागणी आघाडीने पंतप्रधानांकडे केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (NCP womens wing`s agitation against Bilkis Bano accuse)

NCP womens agitation at Dhule
MVP election: निफाड तालुका ठरणार किंगमेकर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने म्हटले आहे की, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना आपण स्त्री शक्तीचा घातलेला जागर आणि तिच्या सन्मानासाठी व्यक्त केलेल्या कटिबद्धतेचा गजर अजूनही आमच्या कानात घुमत आहे. मात्र, यावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्नही मनात घोळत आहे. कारण सकाळी आपले भाषण झाले आणि सायंकाळ पर्यंत बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची गुजरात सरकारने सुटका केल्याच्या बातम्या कानावर आदळल्या.

NCP womens agitation at Dhule
Nashik News: निफाडला ड्रायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा

विशेष सीबीआय न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांची एक राज्य सरकार सहजतेने सुटका करते हे, पाहून प्रचंड धक्का बसला. त्या ११ जणांची सुटका झाल्यानंतर ज्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला, त्यांचा सत्कार केला त्यांचा यंत्रणेमार्फत शोध घ्या.

सैतानी प्रवृत्तीचे अशा पद्धतीने उद्दातीकरणाचे एक भारतीय महिला म्हणून आम्हाला लाज वाटते. याप्रकरणात स्वतः लक्ष घालून मोकाट फिरणाऱ्या बलात्कारींना पुन्हा गजाआड करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केली. आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, कार्याध्यक्षा संजीवनी पाटील, उपाध्यक्षा सरोज पवार, जिल्हा सचिव माधुरी पाटील, शहराध्यक्षा सरोज कदम, शारदा भामरे, वनिता सूर्यवंशी, वंदना कंदार, नीलिमा मोरे, रेना खेडकर, विमल सोनवणे, विठा बिऱ्हाडे, मीना सूर्यवंशी आदींचा निषेध आंदोलनात सहभाग होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in