Chhagan Bhujbal Health Update: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली

Chhagan Bhujbal Health: येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Nashik News : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. कार्यक्रम आटोपून येवल्याहून नाशिकला परतत असतानाच भुजबळ यांना थंडी, ताप वाढल्यानं त्यांना उपचारासाठी तातडीनं अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ( Chhagan Bhujbal) यांची प्रकृतीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं येवल्याला गेले होते.

Chhagan Bhujbal
Pune News : बदली न करण्यासाठी मागितली लाच; पुणे महापालिकेचा आरोग्य निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

राहुल गांधी प्रकरण भाजपच्याच अंगलट येईल,भुजबळांचा दावा

सध्या देशभर राहुल गांधी यांच्यावर लोकसभेने केलेली कारवाई व भारतीय जनता पक्षाने त्या विरोधात भाजपकडून सुरु असलेले `ओबीसी` आंदोलनाच्या प्रकरणातील हवाच भुजबळ यांनी काढून घेतली. ते म्हणाले, राहुल गांधी आणि अडानी प्रकरणाशी `ओबीसी`चा काहीच संबंध नाही. आता राहुल गांधी प्रकरण भाजपच्याच अंगलट येईल, असा दावा त्यांनी केला.

इंदिरा गांधी यांचा हा इतिहास आपल्या समोर आहे. असे असताना कुणाला वाटत असेल की राहुल गांधींचे तोंड बंद करा, त्यांना लोकसभेच्या बाहेरच काढुन टाका, तर हे कुणालाही आवडणार नाही असे मला वाटते. ते कोणाला आवडेल असे मला वाटत नाही. या प्रकरणानंतर अगदी सगळे विचारवंत देखील राहुल गांधी यांच्या बाजुने जोरात बोलत आहेत.

Chhagan Bhujbal
Shahaji Patil News : आता नातवाचा निर्णय मान्य करायचा का? शहाजी पाटलांचा गणपतराव देशमुखांच्या नातवावर हल्लाबोल

ब्रिटीश देखील त्यावेळेला जे कोणी विरोधात असतील, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल असतील त्यांना नमवू शकले नाहीत. त्यांना संपवू शकले नाही. हा भारत देश आहे. हा सव्वाशे कोटींचा देश आहे हे लक्षात ठेवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com