Ahmednagar News: नगर जिल्हा बँकेत अजित पवारांना विखे पाटलांचा धक्का; नाट्यमय घडामोडीनंतर शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी

Ahmednagar District Central Cooperative Bank: अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीला धक्का, जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात
Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar District Central Cooperative Bank Sarkarnama

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता.

आज अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांचा विजय झाला.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Bacchu kadu news; कायद्याचा गैरवापर होत असल्याने लक्षवेधी मांडणार!

कर्डिलेंना दहा मतं तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मतं मिळाली. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे विजयी झाले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजी कर्डिले यांची आज निवड झाली. या पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले तसेच कर्डिले यांनी अर्ज दाखल केले होते.

त्यानुसार कर्डिले यांना 10 मते मिळाली, तर घुले यांना 9 मिळाली. आणि एक मत बाद झाले. त्यानुसार ही निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Akola : वर्ष झाले; महानगरपालिकेवर प्रशासक राज कायम, इच्छुकांचा तयारीला ब्रेक !

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे मंगळवारी नगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नवीन अध्यक्ष निवडीबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडाळाशी चर्चाही केली होती.

त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी या अध्यक्षपदासाठी अर्जही भरला. यावेळी सर्वांना वाटलं की ही निवडणूक बिनविरोध होईल. मात्र, शेवटच्या क्षणी शिवाजी कर्डिले यांनी अर्ज भरला आणि ते विजयी झाले.

राधाकृष्ण विखे पाटलांनी चमत्कार घडवत शेवटच्या क्षणी बाजी पलटवली. त्यामुळे अजित पवारांसह बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com