Karjat Bazar Samiti Results: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; फेर मतमोजणी सुरू

Karjat Bazar Samiti News : राम शिंदे यांचा गट आणि रोहित पवार यांचा गट अशा दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ अशा समान जागा मिळाल्या आहेत.
Karjat Bazar Samiti
Karjat Bazar Samitisarkarnama

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अहमदनगरधील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळपासूनच सुरवात झाली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीमध्ये भाजप नेते राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या गटात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

Karjat Bazar Samiti
Karjat Bazar Samiti Results: कर्जत बाजार समितीत राम शिंदे - रोहित पवारांमध्ये मोठी चुरस; शिंदे आघाडीवर...

कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या दोन्ही गटाला बहुमत मिळालं नाही. राम शिंदे यांचा गट आणि रोहित पवार यांचा गट अशा दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ अशा समान जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे आता दोन जागांसाठी फेर मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. राम शिंदे गट आणि रोहित पवार गट यांच्यापैकी आता कोण बाजी मारणार? ते थोड्याच वेळात समोर येणार असून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Karjat Bazar Samiti
Sangamner Bazar Samiti Results : संगमनेरचा गड थोरातांनी राखला; विखेंना धक्का

दरम्यान, कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पॅनलकडून उभे राहिले होते. त्यामुळे राम शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लगालं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com