Nashik News: समता परिषदेच्या कार्यकारीणीत खांदे पालट!

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त, पूजा आहेर, आशा भंदुरे यांची नियुक्ती.
Puja Aher-Endait & Asha Bhandure
Puja Aher-Endait & Asha BhandureSarkarnama

नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Samta Parishad) महिला आघाडीच्या (Womens wing) जिल्हाध्यक्षपदी पूजा आहेर -एंडाईत (Pooja Aher) तर महिला शहराध्यक्षपदी आशा भंदुरे (Asha Bhandure) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. (Pooja Aher & Asha Bhandure appointed new womens president)

Puja Aher-Endait & Asha Bhandure
Onion News: केंद्र शासनाने बंद केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करा

त्यांच्या निवडीबद्दल माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर,नाशिक शहराध्यक्ष कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Puja Aher-Endait & Asha Bhandure
BJP News: भाजप नगरसेविका म्हणाल्या, कुठल्या तोंडाने निवडणुकीत मते मागायची!

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी पूजा आहेर एंडाईत तर महिला शहराध्यक्षपदी आशा भंदुरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच लवकरच नाशिक जिल्हा व शहर महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in