Ahmednagar : काँग्रेसला मोठं खिंडार; 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
BJP and Congress
BJP and CongressSarkarnama

Karjat-Jamkhed : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आज विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते.

BJP and Congress
H3N2 Influenza : नव्या विषाणूने वाढवलं टेन्शन ; मास्क वापरा, नीती आयोगाचं आवाहन !

काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट भाजप नेते राम शिंदे यांनी केले होते. त्यानंतर अखेर आज फडवीसांच्या उपस्थित काँग्रेससह इतर पक्षातील काही काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रवीण घुले हे कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तर राम शिंदे यांची काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवर निवड झाली. त्यानंतर राज्यातही सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढल्याचे दिसून येत आहे.

BJP and Congress
Pafull Patel News : शिंदे-फडणवीसांनी आमच्याच योजनांची नावे बदलवून त्या मांडल्या !

दरम्यान, कर्जत-जामखेड तालुक्यात प्रवीण घुले यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला त्यांच्या संपर्काचा मोठा फायदा होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in