विश्वास पाटील करणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले आहे.
विश्वास पाटील करणार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
Vishwash PatilSarkarnama

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणाऱ्या मैदानाचे भूमिपूजन केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्या हस्ते मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे संध्याकाळी पार दिमाखात पार पडला. या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते.

Vishwash Patil
मोदी सरकारने आतातरी धडा घ्यावा; जनमताचा आदर करावा!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन 3 डिसेंबर रोजी होणार आहे. याचे उद्घाटन प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष विज्ञान लेखक जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रितो असतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, तसेच न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. याबाबतची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

Vishwash Patil
पोलिसांचे अजब फर्मान ; मोदी येताहेत ; बाल्कनीत कपडे वाळत घालू नका!

छगन भूजबळ म्हणाले, 48 तास कवीसंम्मेलन कार्यक्रम नॅानस्टॅाप सुरू राहणार यासाठी प्रयत्न असून हा एक विक्रम असेल, होणाऱ्या कवीसंमेलनामध्ये सुमारे एक हजार कवीता आल्या आहेत. याबरोबरच या कार्यक्रमासाठी अनेक कलाकार येणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात येत असून दहा दजार नागरिकांना बसता येईल एव्हढा मोठा मंडप उभारण्यात येणार आहे. यासाठी अनेक शासकीय व निमशासकीय संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. यासाठी नाशिक महापालिका आयूक्त व जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे. राहण्याच्या व्यवस्थेसाठी अनेक हॅाटेल व्यावसायीकांनी रूम द्यायची तयारी दाखवली आहे. एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरात साहित्य संमेलन होत असल्याने या ठिकाणी देशातील विविध भागातून मान्यवर येणार आहेत. यामुळे नाशिक बद्दल त्यांचे मत चांगले व्हावे तसेच, या माध्यमातून नाशिक शहराचे ब्रॅन्डींग होणार आहे. यासाठी नाशिककर भेदभाव, पक्ष विसरून सर्वजन मिळुन सहकार्य करतील अशी आशा आहे. साहित्य संमेलन पार पाडण्यासाठी आर्थीक मदतीसाठी महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी मदत देण्याची तयारी दर्शवली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in