कारखान्यात दारू गाळणाऱ्यांचा वाइनला विरोध हा विनोद!

पालकमंत्री छगन भुजबळ याचे नाव न घेता विरोधकांवर टीका
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : वाइन (Wine) म्हणजे दारू (Liquer) नव्हे, त्यामुळे वाइनला विरोध करण्याची गरज नाही. प्रत्येक निर्णयाला सुरवातीला विरोध हा होतोच; पण किराणा दुकानात वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांत कारखान्यात दारू गाळणाऱ्यांपैकीच काही जण आघाडीवर आहेत. अशी टीका पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली.

Chhagan Bhujbal
द्राक्ष उत्पादकांचा इशारा, ‘वाइन’चा अपप्रचार थांबवा!

राज्य शासनाने किराणा मॉलमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात टीका होत असल्याने त्याविषयी भुजबळ यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की वाइन हे हेल्‍दी पेय आहे. वाइन कल्चर वाढवावे, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामागे शेतकरी, अर्थकारण आणि आरोग्यदायी पेय मिळावे, अशी भूमिका आहे. त्यामुळे वाइन विक्रीला विरोध करण्याची गरज नाही. कुठल्याही निर्णयाला सुरवातीला विरोध होतोच. नाशिकला गंगापूर धरणावर बोट क्लब सुरू करण्याच्या निर्णयावेळी असाच विरोध झाला. मात्र आता बोटिंग क्लबवर सगळं अलबेल सुरू आहे. वाइनबाबतही तसेच होईल. दरम्यान, याला विरोध करणाऱ्यांत कारखान्यात दारू गाळणारेच आघाडीवर आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Chhagan Bhujbal
प्रभाग रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्स ॲप चॅटिंग तपासा!

मी हिंट दिली, शोध तुम्ही घ्या

वाइनला विरोध करणारे ते दारू गाळणारे कोण? याविषयी विचारले असता, मी हिंट दिली. पत्रकारांनी शोधपत्रकारिता करावी. हिंट देण्याचे काम मी केले आहे. इन्वेस्टिंगेशनचे काम तुम्ही करा, असा सावध पवित्रा घेताना त्यांनी वाइनला विरोध करणाऱ्या विरोधकांचे नाव घेण्याचे टाळले.

ऑफलाइन परीक्षेत गैर काय?

राज्यात दहावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी जोर धरत असून, ठिकाठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्याविषयी भुजबळ म्हणाले, की जे ऑनलाइन शिकले, तेच ऑफलाइन पेपरमध्ये लिहायचे आहे. त्यात चुकीचे काय आहे. ऑनलाइन अभ्यास केला असेल, तर ऑफलाइन पेपरला का घाबरायचे. फक्त कागदावर तर लिहायचे आहे, असा उलटा प्रश्‍न त्यांनी केला. तसेच, वीजबिलाविरोधात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्याबाबतही त्यांनी वीज वितरण कंपनीवर ५५ ते ६० हजार कोटींचे कर्ज असून, कंपनी वाचविण्यासाठी वीजबिल भरणे गरजेचे असल्याचे सांगून कंपनीने ३३ टक्के सवलत दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com