Chhagan Bhujbal News; राज्यात आणीबाणी लागू केली आहे काय?

महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानागीसाठी टाळाटाळ केल्याने छगन भुजबळ नाराज
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मुंबईतील मोर्चाला पोलिस (Police) परवानगी देत नाहीत. अनघा लेले यांच्या इंग्रजी पुस्तकाच्या मराठीतील अनुवादित पुस्तकाचा पुरस्कार रद्द केला. या साऱ्या घटनामुळे राज्यात (Maharashtra) अघोषित आणीबाणी (Emergency) लागू आहे काय? असा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे राज्य सरकारला केला. ते पत्रकारांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal deemands Home minister should intervene for Permission of Morcha)

Chhagan Bhujbal
Shivsena; ठाकरे गटाला मोठा धक्का; अकरा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मोर्चाला नियोजित मार्गाने परवानगी द्यावी, असे सांगून श्री. भुजबळ यांनी इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनाची आठवण करून दिली. ते म्हणाले, आमचा नक्षलवादाला पाठिंबा नाही. राज्य सरकारचा वाड्ःमयीन पुरस्कार अनघा लेले यांच्या मराठीतील अनुवादासाठी मिळालेला आहे. शिवाय मूळ इंग्रजी भाषेतील आणि अनुवादित पुस्तकावर बंदी नाही. त्याचबरोबर पुरस्कार रद्द करण्याच्या घटनेबद्दल सर्वत्र निषेध होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री. फडणवीस यांनी ‘आ बैल मुझे मार' या पद्धतीने मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयात लक्ष घालावे.

Chhagan Bhujbal
NCP Latest News: राष्ट्रवादीच्या चव्हाणांचे मन पदवीधरमध्ये रमेना, विधानसभेसाठी तयारी सुरू?

केंद्रशासित प्रदेश करावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र वादासंबंधी समिती स्थापन करण्याचा चांगला निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्‍न असून समितीत त्रयस्थ लोक घेतले जावेत अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी श्री. शहा यांनी खोलात जाऊन बेळगावसह इतर भागाबद्दल न्यायालयाच्या बाहेर काही मार्ग निघतो काय? याचा प्रयत्न करायला हवा. बेळगावसह इतर ठिकाणी कानडी भाषेची सक्ती केली जाऊ नये. या भागाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा. त्यातून मराठी भाषिकांवरील अन्याय थांबण्यास मदत होईल, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

महामार्ग सुस्थितीत असावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गाचे काँक्रिटीकरण केले जाईल, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरवात करावी. तोपर्यंत महामार्ग सुस्थितीत राहावा यासाठी त्यांनी अधिकचे लक्ष द्यावे. महामार्गाच्या दुरवस्थेची परिसीमा झालेली आहे. नाशिक-मुंबई प्रवासासाठी सहा तासाचा वेळ लागतो आहे, असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com