
नाशिक : माझा शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांच्याशी चांगलाच वाद चालला होता. मात्र एका बातमी संदर्भात त्यांच्या अटकेची वेळ आली तेव्हा मी काहीही करून त्यांची अटक टाळा. जामीन मिळत असेल तर मिळू द्या. अटक झालीच तर मातोश्री निवासस्थान हेच जेल समजून त्यांना तीथे राहू द्या, अशा सूचना दिल्या होत्या असे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal said, we have very healthy relations With Balasaheb Thakre)
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी श्री. भुजबळ यांचे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्याशी असलेल्या वादाचा विषय पुढे करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. त्यबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, चेंबूरच्या रमाबाई आंबेडकर येथील पुतळा विटंबणा प्रकरणी धुळे येथील राजू चोरडीया (जैन) याने ती घटना मी घडवली, असे प्रतिज्ञापत्र दिले होते. ‘सामना’मधून त्यासंबंधीचा मथळा प्रसिद्ध झाला. या विषयावर गुंडेवार आयोगाने मला ‘क्लीन चीट’ दिली. त्यानंतर याबाबत संपादक बाळासाहेब ठाकरे आणि विश्वस्तांच्याविरोधात मी अब्रूनुकसानीचा दावा केला होता. हा खटला अंतीम सुनावणीला असताना मी तो मागे घेतला. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी मला निवासस्थानी बोलावून मला माफ केले होते. आमच्यातील सर्व मतभेद संपले.
राज्यात १९९९ मध्ये आमचे सरकार आल्यावर शिवाजी पार्कमधील सभेत १९९२-९३ दंगलीतील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार खटले दाखल करू, असे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. त्या वेळी मी गृहमंत्री होतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासंबंधीची फाइल माझ्याकडे आली. मात्र तत्कालीन पोलिस आयुक्त एन. एम. सिंह यांना ठाकरे यांची पोलिस कोठडी मागू नये, अशी सूचना मी केली होती. बाळासाहेबांना जामीन घ्यायचा असल्यास घेऊद्यात, त्यांना अटकेत ठेवू नये, असेही सांगितले होते. न्यायालयाने अटकेचे आदेश दिले तर ‘मातोश्री’ला तुरुंग समजून बाळासाहेबांना निवासस्थानी राहू द्यात, त्यांना तुरुंगात पाठवू नका, असेही स्पष्ट केले.
सामना विरोधातील अब्रूनुकसानीच्या दाव्याचा निकाल लागण्याची वेळ आली होती. तेव्हा सुभाष देसाई आणि संजय राऊत माझ्याकडे आले होते. त्यांनी मला पत्र देखील दिले होते. त्यानुसार बांद्रा न्यायालयात मी हजर झालो आणि न्यायालयाला ‘केस’ मागे घेतली. बाळासाहेब खूप आजारी असताना त्यांना भेटणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये अमिताभ बच्चन, मी आणि आणखी एकजण होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.