Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांनी अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना खडसावले

मुंबई गोवा महामार्गाच्या अडचणींबाबत सुनिल प्रभूंच्या लक्षवेधीवरील चर्चेत वाद-विवाद रंगला.
Bhaskar Jadhav & Nitesh Rane
Bhaskar Jadhav & Nitesh RaneSarkarnama

मुंबई : मुंबई गोवा महामार्ग (Goa Highway) बारा वर्षे रखडला आहे. तो केव्हा पूर्ण होणार यावर कोकणातील आमदारांनी मंत्री रवीद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विविध प्रश्न केले. यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) बोलत असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अडीच वर्षे वाया गेली असा शेरा मारल्याने जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले. (Minister assures Mumbai-Goa Highway work will complete up to december 2023)

Bhaskar Jadhav & Nitesh Rane
Delhi High Court : भाजपच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा होणार दाखल

आमदार सुनिल प्रभू यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. त्यावर मंत्री चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच तातडीच्या उपाययोजनांसाठी कोकणातील सर्व सदस्यांसह या रस्त्याची पाहणी करून तात़ीचे उपाय करू असे सांगितले. यामध्ये भुसंपादन, भौगोलीक स्थिती, माती ढासळणे, न्यायालयीन वाद आदी अडथळे आहेत. त्यात लवकरात लवकर मार्ग काढून काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Bhaskar Jadhav & Nitesh Rane
Maharashtra Assembly Live : आजचा दिवसही वादळी ठरणार

कशेडी घाटात चुकीच्या पद्धतीने काम झाले. त्यामुळे भुसभुशीत झालेल्या डोंगराची माती सतत ढासळते आहे. त्यामुळे बारा हजार ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहे. या रस्त्याचे आठ टप्पे केले आहेत. त्यात पनवेल इंदापूर हा टप्पा सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. उर्वरीत काम राष्ट्रीय महामार्ग करत आहे. याबाबत माजी मंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्ष काम जैसे थे आहे. मुंबईचे चाकरमाने गौरी गणपतीसाठी कोकणात जात आहेत. त्याआधी रस्त्याची अडचण दूर करा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी भास्कर जाधव यांनी या विषयावर सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही थकलो मात्र शासनाचे अधिकारी तीच तीच उत्तरे देताना थकत नाहीत. त्यात बारा वर्षे झाली, असे सांगितले. ते बोलत असताना नितेश राणे यांनी `त्यात मधली अडीच वर्षे वाया गेली` असा शेरा मारला. त्यावर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको. मी मंत्र्यांशी बोलतो आहे. त्यावर राणे पुन्हा पुन्हा शेरे मारतच होते. तेव्हा मात्र भास्कर जाधव यांनी त्यांना चांगलेच खडसावले. त्यामुळे सभापती राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा लागला.

या चर्चेत सुनिल प्रभू, रवींद्र वायकर, नितेश राणे, भास्कर जाधव, राजन साळवी, मनीषा चौधरी आदींनी चर्चेत भाग घेतला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in