
जळगाव : जिल्ह्यातील (Jalgaon) ग्रामीण आणि शहरी भागांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेल्या निधीतील कामे ही दर्जेदार आणि गतीने करावेत. यासाठी अचूक नियोजन करून आगामी निवडणुकीच्या (ZP elections) आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्काळ नवीन प्रस्ताव, प्रलंबित कामांचे फेरप्रस्ताव सादर करण्यात यावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिले. (Administrative shall prepare for Devolopment works)
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचायतींची आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, सहायक नियोजन अधिकारी बाविस्कर, नियोजन खात्याचे अधिकारी डी. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती.
मंत्री पाटील यांनी यात डीपीडीसीमार्फत मागील वर्षी जि. प. कडे उपलब्ध करून दिलेल्या १९७ कोटी ५६ लाख ९१ हजार रूपयांचा निधीतील कामांचा आढावा घेतला. त्यांनी यावर्षी दिला जाणारा सुमारे १९० कोटी रुपये निधीच्या नियोजन संदर्भात आढावा घेऊन विविध खातेप्रमुखांना निर्देश दिले. यात ग्रामपंचायत, सिंचन, बांधकाम, महिला बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, आरोग्य, नावीन्यपूर्ण योजनांचा खातेनिहाय सविस्तर आढावा घेतला. गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या तत्काळ निविदा काढून याच्या वर्कऑर्डर प्रदान कराव्यात असे निर्देश दिलेत. या वर्षाच्या कामांचे ८-१० दिवसात नियोजन करण्याचे सांगितले. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे कामांचे नियोजन तत्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
१२८ कोटींच्या कामांचा आढावा
नगरपालिका, नगरपंचायतींच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राऊत, नगरपालिकांचे जिल्हा प्रशासन अधिकारी जनार्दन पवार, मुख्याधिकारी उपस्थित होते. महापालिका, नगरपालिका मिळून मागील वर्षी व यावर्षी दिलेल्या निधीच्या २०-२१ मध्ये १५९ कोटी ७४ लाख निधी मंजूर केला होता. त्यातील १०५ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. २१-२२ मध्ये मंजूर निधी ७४ कोटी १८ लाख, ५४ कोटी स्पील असा एकूण १२८ कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.