निवृत्तीला दोन तास बाकी असताना लाचेचा मोह: बीडीओंना सत्काराऐवजी पडल्या बेड्या!

लाचखोर बीडीओ आणि सहाय्यक लेखाधिकाऱ्याचाही लाच प्रकरणात सहभाग
Bribe accuse Y. D. Shinde & Chunilal Deore
Bribe accuse Y. D. Shinde & Chunilal DeoreSarkarnama

शिरपूर : निवृत्तीला (Retiremnet) अवघे दोन तास शिल्लक असताना पाच हजारांची लाच स्वीकारताना येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे (Y. D. Shinde) व सहायक लेखाधिकारी चुनीलाल देवरे यांना धुळे (Dhule)येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने (ACB) मुद्देमालासह ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे पंचायत समितीत महिन्याभरापासून सुरू असलेल्या वसुली कारवाईची चर्चा खरी ठरली.

Bribe accuse Y. D. Shinde & Chunilal Deore
नऊ वर्षानंतर उघडणार नाशिक साखर कारखान्याचे कुलूप!

शिरपूर पंचायत समितींतर्गत हाडाखेड (ता. शिरपूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यांनी घराच्या दुरुस्तीसाठी भविष्यनिर्वाह निधीच्या जमा रकमेतून पाच लाख रुपये अग्रीम मिळण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. शिंदे यांची भेट घेऊन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. शिंदे यांनी पाच हजार रुपये दिल्यानंतरच मंजुरी मिळेल, असे सांगितले. त्यामुळे शिक्षकाने बुधवारी (ता. ३०) धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागातर्फे तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले. त्यामुळे गुरुवारी पंचायत समितीच्या आवारात सापळा रचण्यात आला.

Bribe accuse Y. D. Shinde & Chunilal Deore
दमणगंगेचे पाणी वळवून सिन्नरचा दुष्काळ संपवणार!

गटविकास अधिकारी युवराज शिंदे गुरुवारी निवृत्त होणार असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती. संबंधित शिक्षकाने त्यांची कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी लेखा विभागात देवरेंकडे पैसे दे, असे सांगितले. शिक्षकाने लेखा विभागात जाऊन सहाय्यक लेखाधिकारी चुनीलाल देवरे याच्याकडे पाच हजार रुपये दिले. त्याने रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने झडप घालून देवरे याला ताब्यात घेतले. पाठोपाठ शिंदे यांनाही ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंह चव्हाण, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, भूषण शेटे, कैलास जोहरे, शरद काटके, महेश मोरे, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी कारवाई केली.

मार्चअखेर धडाका

महिनाभरापासून पंचायत समितीच्या विविध विभागांची कामे निपटण्याच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत बीडीओ ऑफिसमधली वर्दळ चर्चेत होती. बीडीओंसह काही विशिष्ट अधिकारी ओव्हरटाइम करीत होते. विशेष म्हणजे निवृत्तीनंतरही किमान दोन महिन्यांपर्यंत बीडीओ शिंदे फायलींवर सह्या करीत राहतील, अशी अर्थपूर्ण तजवीज केली होती. वसुलीबाबत शिक्षण विभागाचा क्रमांक वरचा असल्याची चर्चा होती, ती या कारवाईने खरी ठरली.

बोकड, किराणा गायब

शिंदे यांच्या निवृत्तीनिमित्त शहराबाहेर फार्म हाउसवर शुक्रवारी अनौपचारिक निरोप समारंभ होता. त्यात लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. निमंत्रणपत्रिकाही छापल्या होत्या. सामिष व शाकाहारी भोजन असून, सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र दुपारच्या कारवाईनंतर लगोलग खरेदी केलेला बोकड, किराणा गायब करण्यात आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in