बंडूकाका बच्छाव बंडखोर दादा भुसेंचे राजकारण विस्कटवणार?

दादा भुसेंचे निकटवर्तीय मात्र सध्या दुरावलेले बंडूकाका बच्छाव शिवसेनेत सक्रीय होण्याची शक्यता
Dada Bhuse News, Bandukaka Bachhav News, Nashik News, Malegaon News
Dada Bhuse News, Bandukaka Bachhav News, Nashik News, Malegaon NewsSarkarnama

मालेगाव : कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोर गटात सामील झाले. त्यामुळे त्यांचे पूर्वाश्रमीचे निकटवर्तीय व सध्या त्यांच्यापासून दुखावलेले बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव (Bandukaka Bachhav) शिवसेनेत सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्या राजकारणाची घडी व भविष्य एकेकाळचे त्यांचे कट्टर समर्थकच विस्कटून टाकतील असे चित्र आहे. (Dada Bhuse`s future politics may disturb by own Followers)

Dada Bhuse News, Bandukaka Bachhav News, Nashik News, Malegaon News
'बंडखोर आमदारांच्या रोजच्या जेवणाचे बिल आठ लाख रुपये'

या बंडाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शहर व तालुक्यातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांची ही स्थिती असताना अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते द्विधा मनःस्थितीत आहेत. (Dada Bhuse News in Marathi)

Dada Bhuse News, Bandukaka Bachhav News, Nashik News, Malegaon News
'राऊतांच्या सल्ल्याने अख्खी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधायची का?'

यातील अनेकांनी या वादावर काय तोडगा निघतो, नेमका या नाट्यावर केव्हा पडदा पडतो, त्यानंतरच भूमिका निश्‍चित करण्याचे ठरविले आहे. सामान्य कार्यकर्त्यांनी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी युती कार्यकर्त्यांनी नाक मुरडतच स्वीकारली होती, अशी भावना व्यक्त केल्या आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. त्यात कृषीमंत्री दादा भुसे देखील सहभागी झाले. त्यामुळे मालेगाव परिसरात ‘कही खुशी कही गम’ असे चित्र आहे. अनेक नेत्यांनी अद्याप स्पष्ट भुमिका न घेतल्याने शिवसेनेत मोजकेच शिलेदार राहण्याची शक्यता दिसू लागली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात मंत्री दादा भुसे दाखल झाल्यानंतर शहर व परिसरात ‘कही खुशी कही गम’, अशी स्थिती आहे. नाशिक, सटाणा येथे श्री. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांविरुद्ध आंदोलन व शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मालेगाव शहर व तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक पदावर असलेले काही मोजके शिलेदार मात्र शिवसेनेतच असून, त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचवेळी तटस्थ असलेले काही नेते नजीकच्या काळात आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

नवनिर्वाचित शहरप्रमुख राजाराम जाधव, माजी प्रमुख रामा मिस्तरी, माजी तालुकाप्रमुख संजय दुसाने, संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला, विलास बिरारी आदींसह मोजक्या जुन्या-जाणत्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मावळते उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, युवासेनेचे विनोद वाघ, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, शशिकांत निकम आदींनी श्री. भुसे यांची पाठराखण केली आहे. तूर्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेले व भुसे यांना पाठिंबा दर्शविणारे सर्वच पदाधिकारी श्री. भुसे यांच्या विश्‍वासातील व हक्काचे मानले जातात. मात्र काही जुन्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना हीच ओळख असल्याने त्यांनी नाराजीने का होईना पक्षाच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तूर्त राज्य पातळीवरील नेत्यांप्रमाणेच ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com