पक्षांतर बंदीमुळे खडसेंना धक्का : भुसावळचे दहा नगरसेवक अपात्र

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही कारवाई केल्याने भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
 Eknath Khadase
Eknath KhadaseSarkarnama

जळगाव - भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून पक्षांतर बंदी कायद्यानुसार भुसावळचे दहा नगरसेवक 18 डिसेंबर 2021 पासून ते नगरपरिषदेच्या पुढील एक कार्यकाळासाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही कारवाई केल्याने भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ( Ban on defection to Khadse: Ten corporators of Bhusawal disqualified )

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील त्यांच्या काही समर्थकांनीदेखील भाजपला सोडचिठ्ठी दिली. 18 डिसेंबर 2021 रोजी भुसावळ येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला होता. यावेळी दहा नगरसेवकांनी भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले होते. त्यामुळे पुष्पाबाई रमेशलाल बत्रा यांनी या दहा नगरसेवकांना अपात्र करावे म्हणून, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायासनासमोर सुनावण्या झाल्या.

 Eknath Khadase
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मोठी शक्ती; एकनाथ खडसे स्पष्टच बोलले!

सुनावणी दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही कडील बाजू ऐकूण घेतल्या त्यानंतर आज भुसावळच्या या दहा नगरसेवकांना 18 डिसेंबर 2021 ते नगरपरिषदेच्या पुढील एक कार्यकाळापर्यंत अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदारातर्फे अॅड. राजेंद्र टी. राय तर नगरसेवकांतर्फे अॅड. महेश भोकरीकर, अॅड. हरिश पाटील यांनी काम पाहिले.

 Eknath Khadase
भुसावळ पालिकेवर आजपासून भाजप आऊट, प्रशासक इन!

हे आहेत अपात्र नगरसेवक

लोकनियुक्त नगराधयक्ष रमण देविदास भोळे, नगरसेवक अमोल मनोहर इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, सविता रमेश मकासरे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, ऍड. बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, किरण भागवत कोलते, शैलजा पुरुषोत्तम नारखेडे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in