Sangamner Bazar Samiti Results: संगमनेर बाजार समितीत आजी-माजी महसूलमंत्र्यात प्रतिष्ठेची लढाई; कोण मारणार बाजी?

Balasaheb Thorat : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाळासाहेब थोरात यांच्या गटाने चार जागा जिंकल्या
Sangamner Bazar Samiti Results
Sangamner Bazar Samiti ResultsSarkarnama

Sangamner : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाळासाहेब थोरात यांच्या गटाने चार जागा जिंकल्या आहेत. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने अद्याप खातेही उघडले नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sangamner Bazar Samiti Results
Ahmednagar Bazar Samiti : नगर बाजार समितीत काटे की टक्कर; कोण मारणार बाजी?

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमध्ये आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलमध्ये जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी येथे थोरात गट सर्व जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजी कोण मारणार? हे थोड्याच वेळात समोर येणार आहे.

Sangamner Bazar Samiti Results
Vadwani APMC Election : महाविकास आघाडीने खाते उघडले,वडवणीत एकहाती सत्ता..

दरम्यान, संगमनेर बाजार समितीत पहिल्या फेरीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या पॅनलची आघाडी घेतली आहे. 18 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर झाला असून 4 ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. तर सध्या तरी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पॅनल पिछाडीवर आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com