Eknath Shinde: राज्यात खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सरकार

नाशिक येथे स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांना शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
CM Eknath Shinde at Nashik
CM Eknath Shinde at NashikSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांच्या विचारांचे सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झाले असून, हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार असल्यामुळे कुणाचीही निराशा होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. (CM Eknath Shinde claims, we will follow ideology of Balasaheb Thakrey in government)

CM Eknath Shinde at Nashik
Sharad Pawar: सरकार केव्हा पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही!

शुक्रवारी रात्री अकराला त्यांचे येथे आगमन झाल्यानंतर श्री. शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, शिवसेनेचे माजी सभागृहनेता मामा ठाकरे, योगेश मस्के आदी उपस्थित होते.

CM Eknath Shinde at Nashik
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे `मालेगाव`च्या ट्रॅपमध्ये अडकणार!

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की नाशिक विभागाचा जातीने आढावा घेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. शहर व जिल्ह्यासाठी काहीही कमी पडणार नाही. पंढरपूरच्या धर्तीवर नाशिकच्या आसपासच्या तीर्थक्षेत्रांचादेखील विकास करण्यात येईल.

तत्पूर्वी पाथर्डी फाटा चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सायंकाळी सातपासूनच शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिवसेनेचे माजी नगरसेवक व सध्या राजकीय प्रवाहाबाहेर असलेल्या मामा ठाकरे यांनीदेखील त्यांचे स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि स्वागतासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण पाथर्डी फाटा चौक फलकांनी आणि भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आला होता. सेनेच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के, सुजित जिरापुरे, राम रेपाळे आदींनी संयोजन केले. या वेळी विविध संघटना, पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत राहू, असे सांगत त्यांच्या सेनेत प्रवेश केला. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in