प्रकाश आंबेडकरांनी तळ ठोकला, काय असतील डावपेच?

अविनाश शिंदेच्या "फार्म हाऊस" वर ॲड.आंबेडकरांची राज्य पदाधिकाऱ्यांशी गुफ्तगू ने चर्चेला उधाण..!
Adv. Prakash Ambedkar with Office bearers
Adv. Prakash Ambedkar with Office bearersSarkarnama

नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकला (Nashik) धावती भेट दिली होती. आता पुन्हा राज्य कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने त्यांचे नाशिकला आगमन झाले. दोन दिवस त्यांनी मुक्काम ठोकला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंबेडकरांचे डावपेच काय असतील या चर्चेने अन्य पक्षांच्या तो चर्चा व चिंतेचा विषय़ बनला आहे. (Adv. Prakash Ambedkar visit nashik twice recently is a sbject of Discussion)

Adv. Prakash Ambedkar with Office bearers
शिंदे गटाला मिळेना प्रतिसाद; नेत्यांची झाली कोंडी!

अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर आल्याने नवे राजकीय समीकरण येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली.

Adv. Prakash Ambedkar with Office bearers
राष्ट्रवादीने दिला राज्यपालांना थेट इशारा!

दरम्यान बाळासाहेबांच्या सानिध्यात राहता येत असल्याने तसेच त्यांचे मौलिक मार्गदर्शन मिळत असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.

'वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू', असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक वंचित बहुजन आघाडीचे नाशिक महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांच्या नाशिक जवळील अंजनेरी परिसरातील फार्म हाऊस वर पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीत संघटन बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अन्य निवडणुकांत पक्षाचे धोरण काय असेल, तसेच कुणाबरोबर युती करावी आदी विषयांवर गहन चर्चा झाली. प्रत्येक सदस्यांनी आपली मते मांडली. २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास या कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत राजकीय मुद्यांवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवाव्यात, तिकीट वाटपासाठी कोणते निकष ठरवावे या विषयांवर मुद्देसूद चर्चा होऊन त्याबाबतचे विविध ठराव बैठकीत संमत झाले.

ॲड. आंबेडकर यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, धैर्यावर्धन पुंडकर, नागोराव पांचाळ, दिशा पिंकी शेख, सोमनाथ साळुंखे, गोविंद दळवी, अनिल जाधव, सर्वाजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग तसेच निमंत्रित सदस्य अशोक सोनोने, कुशल मेश्राम, विष्णु जाधव, महिला आघाडी महासचिव अरुंधती शिरसाठ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in