Cinet Election : बहिणाबाई चौधरी विद्यापीठ ‘सिनेट’वर भाजपचा डंका, आघाडीला धक्का!

Cinet Election : महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला...
Cinet Election
Cinet ElectionSarkarnama

जळगाव : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत, बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पाच‍ निकाल हाती आले. पाचही राखीव जागांचे निकाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचच्या बाजूने लागले. तर विद्यापीठ महाविकास आघाडीचे व शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे खुल्या गटातून विजयी झाले अजून मतमोजणी सुरू आहे.

तर उर्वरित खुल्या संवर्गातील पाच जागांपैकी विकास मंचचे चार उमेदवार आघाडीवर होते. महाविकास आघाडीला चांगलाच दणका बसला आहे. राखीव जागांमधील अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातून दिनेश चव्हाण, महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन, इतर मागास संवर्गातून नितीन झाल्टे, अनुसूचित जाती संवर्गातून दिनेश खरात हे पाचजण विजयी झाले.

Cinet Election
Imtiaz Jalil On Budget : पगारदार वर्गाला दिलासा, शेतकऱ्यांना धक्का देणारे फ्लाॅप बजेट..

रविवार (ता.२९) विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली होती. वैध मतांच्या आधारे विजयासाठी कोटा निश्‍चित करण्यात आला. सायंकाळी ५.३० वाजता पहिला निकाल हाती आला.

राखीव जागा विकास मंचाकडे :

अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर व भिमसिंग वळवी हे दोघे उमेदवार उभे होते. एकूण ११ हजार १४१ मतांपैकी ८५१ मते अवैध ठरली. नितीन ठाकूर यांना ७ हजार ६७६ मते प्राप्त झाली, तर भिमसिंग वळवी यांना २ हजार ६१४ मते मिळाल्यामुळे ठाकूर यांना विजयी घोषित करण्यात आले.

विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातून दिनेश चव्हाण विजयी झाले. त्यांना ७ हजार १५१ तर प्रतिस्पर्धी नितीन नाईक यांना २ हजार २९२ व सचिन जाधव यांना ७४३ मते मिळाली. या संवर्गात ९५५ मते अवैध ठरली.

महिला संवर्गात स्वप्नाली महाजन यांना पहिल्या फेरीत कोट्यापेक्षा अधिक मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले. या संवर्गात वंदना पाटील यांना २ हजार ४६७, भाग्यश्री महाजन यांना ७२३ तर ज्योती कढरे यांना ५४७ मते प्राप्त झाली. या संवर्गात १ हजार १६६ मते अवैध ठरली.

अनुसूचित जाती संवर्गात ४ उमेदवार उभे होते. विजयी होण्यासाठी ५ हजार ७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. ९९० मते अवैध ठरली. या संवर्गात दिनेश खरात यांना ६ हजार ७१९ मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले. नागसेन पेंढारकर यांना २ हजार ४७१, भगवान अंकुश यांना ६७९, राकेश महिरे यांना २८२ मते मिळाली.

Cinet Election
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

इतर मागास संवर्गात नितीन झाल्टे हे ६ हजार ८६० मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्रकुमार बोरसे यांना २ हजार ५१९, योगेश भावसार यांना ७४६ मते प्राप्त झाली. यासंवर्गात ५ हजार ६३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. १ हजार १६ मते अवैध ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com