Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा!

Bachchu Kadu News : आयुक्तांच्या अंगावर गेले होते धावून..
Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama

Nashik News : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

Bachchu Kadu
Chhatrapati Sambhajinagar: नामांतराचा वाद पेटला; राष्ट्रवादीचे ५० पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार?

२०१७ साली दिव्यांग्यांच्या मागण्यासाठी बच्चू कडू यांनी महापालिकेमध्ये आंदोलन केलेलं होतं. अभिषेक कृष्णा नावाचे नाशिक महापालिका आयुक्त असताना, दिव्यांग्यांचे विविध मागण्या घेऊन कडू हे आयुक्तांच्या दालनात गेले होते. मागण्या मांडत असतानाच दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी कडू यांनी आयुक्तांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होती.

Bachchu Kadu
BJP News : पुणेकरांना कर सवलत मिळणार? भाजपच्या शिष्टमंडळाने फडणवीसांकडे काय केली मागणी?

दमदाटी करणे आणि सरकारी कामात अडथळा करणे या दोन प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा दोन्हीची ती शिक्षा आहे. यावर आता कडू हे उच्च न्यायालयात जातील, मात्र एका आंदोलनाची दखल न्यायालयाने घेतली, हे स्पष्ट होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com