Shirdi Lok Sabha News : शिर्डीच्या जागेवरुन ठाकरे गटात ठिणगी ; भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीला घोलपांचा विरोध

Shiv Sena news : उद्धव ठाकरे यांची भेट घेवून बबनराव घोलप नाराजी व्यक्त केली.
Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure Sarkarnama

किरण कवडे

Nashik News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांना प्रवेश दिल्याने, पाच वेळा आमदार राहिलेले अन् पक्ष फुटीनंतर एकनिष्ठ असलेले माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेवून नाराजी व्यक्त केली.

शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'इंडिया' आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षातील आमदार, खासदार आणि अनेक नेते बाहेर पडल्यानंतरही ठाकरेंसोबत माजी मंत्री बबनराव घोलप एकनिष्ठ राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी घोलप यांना 'मातोश्री'वर बोलवून घेत अमरावती किंवा शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघाचे पर्याय दिले. त्यातून शिर्डी या मतदारसंघाची निवड केल्यानंतर घोलप यांना लोकसभेची तयारीला लागण्याचा शब्दही ठाकरेंनी दिला. या सर्व घडामोडींना वर्ष होत आलेले असताना अचानकपणे भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Ravindra Dhangekar Warning : ...म्हणून जिथे चंद्रकांतदादा जाणार, तिथे आंदोलन करणार : धंगेकरांचा थेट इशारा

त्यांना थेट उमेदवारी दिल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर बबनराव घोलप यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. साहेब, तुम्ही मला शब्द दिलेला असताना वाकचौरेंची 'एन्ट्री' का झाली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर वाकचौरेंना उमेदवारीचा कुठलाही शब्द दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा शिर्डी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना मुंबईत बोलवून घेतले जाईल. या बैठकीला वाकचौरे किंवा घोलप हे दोघेही नसतील. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच उमेदवारी जाहीर करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले.

Babanrao Gholap, Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
DCM Devendra Fadanvis News : विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन ; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले श्रेय..

वाकचौरेंचा राजकीय प्रवास...

भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ मध्ये रामदास आठवले यांचा पराभव करून शिवसेनेकडून खासदार झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर होऊन देखील वाकचौरे यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. मात्र, त्यानंतर सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करून भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in