अजित पवार यांच्यासमोर तरी आपली एकजूट दिसली पाहिजे

भुसावळला राष्ट्रवादी पवार यांच्या दौऱ्यानिमित्त बैठक झाली.
NCP leaders in Meeting
NCP leaders in MeetingSarkarnama

भुसावळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा व शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. गटबाजी खडसे समर्थक आणि इतरांतील गटबाजी संपविण्यासाठी बैठक झाली. मात्र बैठकीला काही खडसे समर्थकांनीच दांडी मारल्याने चो चर्चेचा विषय ठरला.

NCP leaders in Meeting
एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होऊ नये

या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे संतोष चौधरी व खडसे समर्थक सुनील नेवे व्यासपीठावर शेजारी बसले होते. नेवे यांचे भाषण सुरू असताना त्यांना जवळ बोलावून चौधरी यांनी नियोजनासंदर्भात काही सूचना केल्या. असे असले तरी खडसे समर्थक काही कार्यकर्ते आजच्या बैठकीला अनुपस्थित असल्याने, शहराच्या विकासासाठी एक सोडून कोणाशीही तडजोड करण्याची माझी तयारी आहे, असे मत माजी आमदार संतोष चौधरी यांनी आमदार संजय सावकारे यांचे नाव न घेता व्यक्त केले.

NCP leaders in Meeting
"आजकालच्या पुढाऱ्यांच्या बापाचं काय जातं तेच समजत नाही"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा व शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी आमदार मनीष जैन, पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, महिला आघाडी शहराध्यक्षा सारिका पाटील, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

संतोष चौधरी म्हणाले, की आगामी काळात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना सोबत घेऊन आपल्याला काम करावे लागेल. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपली एकजूट महत्त्वाची आहे. अजित पवार यांच्यासमोर आपली एकजूट दिसली तर ते भुसावळच्या विकासासाठी आगामी पाच वर्ष पुरेल एवढे देऊन जातील. पक्षाच्या वाढीसाठी आपसातील हवेदावे बाजूला ठेवले पाहिजे. काही लोक गटबाजी निर्माण करण्यासाठी कलाकारी करतात. आम्ही कोणतेही छुपे काम करीत नाही. उमेदवारी देताना निवडून येण्याचा निकष असावा, असेही चौधरी म्हणाले.

यावेळी प्रा. सुनील नेवे, माजी आमदार मनीष जैन, रवींद्र पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com