संदीप गुळवेच इगतपुरी काँग्रेसचे बॅास, नाना पटोलेंचे शिक्कामोर्तब!

इगतपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतच्या गेले काही दिवस वाद सुरु होता.
Congress leader Sandip Gulve & Ramesh Jadhav

Congress leader Sandip Gulve & Ramesh Jadhav

Sarkarnama

नाशिक : इगतपुरी (Nashik) तालुका काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाबाबत गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या खलबतांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वर्गीय गोपाळराव गुळवे यांचे निकटवर्तीय व ॲड. संदीप गुळवे यांचे समर्थक मानले जाणारे गोंदे दुमालाचे माजी सरपंच रमेश सदाशिवराव जाधव यांचीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) तालुकाध्यक्षपदी निवड कायम केली.

<div class="paragraphs"><p>Congress leader Sandip Gulve &amp; Ramesh Jadhav</p></div>
धक्कादायक; `जीवना`साठी `त्या` रोज देतात मृत्यूला हुलकावणी!

या निवडीमुळे इगतपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबतच्या गेले काही दिवस संपत सकाळे आणि संदीप गुळवे गटातील वर्चस्वाची लढाई थांबली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत श्री. गुळवे यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

<div class="paragraphs"><p>Congress leader Sandip Gulve &amp; Ramesh Jadhav</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

इगतपुरी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी रमेश जाधव यांची २२ डिसेंबरला निवड करण्यात आली होती. मात्र विद्यमान अध्यक्ष रामदास धांडे नाराज होऊन त्यांनी समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यावर प्रदेशाध्यक्षांनी जाधव यांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र काल ही स्थगिती उठविण्यात आली असून, रमेश जाधव यांचीच पुन्हा अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना पाठविले आहे. त्यात धांडे यांना अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या विषयाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

ॲड. संदीप गुळवे यांचे समर्थक मानले जाणारे रमेश जाधव हे काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. औद्योगिक वसाहतीमुळे तरुणांचे ते आशास्थान बनले आहेत. गोंदे दुमाला ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून, गोंदे दुमाला सहकारी संस्थेचे ते संस्थापकीय अध्यक्ष आहेत. शांत, संयमी व मितभाषी म्हणून त्यांची ओळख आहे. जाधव यांच्या रूपाने सर्वसमावेशक अध्यक्ष मिळाल्याने तालुका काँग्रेसमध्ये नवचैतन्य आल्याची भावना काँग्रेसच्या जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तरुणवर्गाशी दांडगा जनसंपर्क असलेले रमेश जाधव यांच्यामुळे तालुका काँग्रेसमध्ये तरुणांची नवी फळी तयार होणार असल्याची प्रतिक्रिया आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष गोपाळा लहांगे यांनी व्यक्त केली.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com