`ईडी`ची कारवाई विसरून राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी!

महाराष्ट्रात भाजपकडून सुडबुद्धीने `ईडी` व केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे.
`ईडी`ची कारवाई विसरून राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी!
Gulabrao Patil, Eknath Lhadse & Girish MahajanSarkarnama

जळगाव : महाराष्ट्रात भाजपकडून सुडबुद्धीने `ईडी` व केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. (BJP leadership using ED & centre investigation agencies in Maharashtra) त्यामुळे भाजपला मैत्री टाळण्यावर खल सुरु होता. (All party leaders thinking tp kept aside bjp in Jalgaon Bank Panel)मात्र शेवटच्या क्षणी सहकारातील राजकीय सोय महत्त्वाची ठरली. अखेर जळगाव जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी भाजपसह सर्व पक्षीय पॅनल निश्चित झाले. (Now all party panel finalise inclueding BJP) त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी केलीच.

Gulabrao Patil, Eknath Lhadse & Girish Mahajan
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

यासंदर्भात शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. त्यामुळे आता जळगाव जिल्हा बॅंकेत सर्व नेते आपल्या समर्थकांना संचालक करण्यात यशस्वी होतील. त्याचबरोबर अनेका इच्छुकांची संधी हुकणार असल्याने त्यांच्या नाराजीलाही नेत्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Gulabrao Patil, Eknath Lhadse & Girish Mahajan
जळगाव जिल्हा बँकेत राजकीय वैर विसरून खडसे, महाजन एकत्र!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज झाले आहेत. त्यांनी सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजप नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, पॅनल करण्याबाबत येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपतर्फे गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, काँग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील उपस्थित होते.

असे आहे जागावाटप

गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सर्व पक्षीय पॅनलचे जागा वाटप निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांना सात जागा, शिवसेनेला पाच तर काँग्रेसला दोन जागा देण्यात येणार आहे. आता प्रत्येक पक्ष त्यांच्या राज्यस्तरीय नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेईल. त्यानंतर या जागा वाटप करण्यावर अंतिम शिक्का मोर्तब करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर म्हणाले, आमचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्यास नाराजी व्यक्त केली आहे. आता जागा वाटप निश्चित झाले आहे, आता वरिष्ठ नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.

...

Related Stories

No stories found.