निवडणूक जवळ येताच नगरसेवकांच्या तडीपारीचा प्रस्ताव : गुन्हे दाखल असलेले नेते हादरले

नाशिकचे (Nashik) राजकीय वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे
Deepak Pande
Deepak PandeSarkarnama

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना (Nashik Election 2022) जाहीर झाल्यानंतर त्या अनुषंगाने इतरही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याची सुरवात नाशिकमध्ये (Nashik) झाली असून विद्यमान नगरसेवक आणि महिला नगरसेवकांचे पती यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांचा नाशिकमधील भद्रकाली (Nashik Police) पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Deepak Pande
ओला चालकाच्या खिशात चपटी अन् पडळकरांचं थेट अजित पवार अन् परबांकडं बोट

आगामी महापालिका निवडणूक (Nashik Election) आणि सण-उत्सव दरम्यान शहरात अशांतता पसरवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार तसेच राजकीय क्षेत्रातील गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकाऱ्यांचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. भद्रकाली पोलिसांनी अशा कारवाईस सुरुवात केली आहे. प्रथमच त्यांच्याकडून नगरसेवक दीपक निवृत्ती दातीर (वय.३१,रा. नवनाथ नगर अंबड), महिला नगरसेविकेचे पती योगेश उर्फ बाळा नामदेव दराडे (वय.३३,रा. अश्विननगर सिडको) तसेच त्यांचे सहकारी किशोर बालाजी साळवे(वय.२४,रा. नवनाथनगर अंबड), योगेश रामकृष्ण चुंबळे(वय.३४, रा.गौळणे), नितीन चंद्रभान सामोरे(वय.३५, रा. स्वामीनगर अंबड) अशा पाच जणांचा भद्रकाली पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच सध्या त्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Deepak Pande
माजी मंत्री विजय शिवतारे 'आयसीयू'मध्ये ; तेथूनच मुलीनं लिहिले कौटुंबिक वादाविषयी..

अंबड आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रांचा वापर करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, शहरात दहशत पसरवणे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. सण-उत्सव निवडणुका दरम्यान अशा व्यक्तींकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे शांतता भंग करणे शासकीय कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे कृत्य घडण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

निवडणूक दरम्यान अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून केली जात असते. परंतु कारवाईच्या सुरुवातीलाच नगरसेवक महिला नगरसेवकांचे पती यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव करण्यात आल्याची चर्चा पसरताच राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. यानंतर कुणाचा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in