Nashik News : नाशिकमध्ये भुजबळांना मोठा धक्का; राष्ट्रवादीचे तब्बल 11 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

Ncp Nashik News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक दौरा केला होता.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal NewsSarkarnama

Chhagan Bhujbal News : नाशिकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे नाशिकमध्ये येऊन गेल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा नाशिकमध्ये (Nashik) रंगल्या आहेत. मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आले. त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Chhagan Bhujbal News
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

मोरे हे भुजबळ यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकमधील सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. या शिवाय भुजबळ यांच्या समता परिषदेचे ते माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. बावनकुळे यांच्या सटाणा दौऱ्यावेळी मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

Chhagan Bhujbal News
Market Committee Election : नगर बाजार समितीत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत नाश्ता : नीलेश लंकेंची घोषणा

मोरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक ग्रामीणमध्ये पक्षाला मोठी ताकद मिळेल. शहर विकास आघाडीचे 11 माजी नगरसेवक कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मोरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. फक्त प्रवेशाची तारीख ठरायची बाकी आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com