Shivsena: शिंदे सेनेच्या बंटी तिदमेंचा शिवसेनेने चोख बंदोबस्त केला!

म्युनिसिपल संघटनेचे सूत्रे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या हाती दिल्याने तिदमेंची राजकीय कोंडी.
Babanrao Gholap with Sudhakar Badgujar & Leaders.
Babanrao Gholap with Sudhakar Badgujar & Leaders.Sarkarnama

नाशिक : माजी नगरसेवक प्रवीण तिदमे (Pravin Tidme) एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. त्यांची हकालपट्टी (Expulson) झाल्यानंतरही म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या (Municiple kamgar sena) अध्यक्षपदावर त्यांनी दावा केला होता. तिदमे यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी पक्षाने महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे संघटनेची सूत्रे सोपविली. (Eknath Shinde group`s Pravin Tidme`s political way is not simple now)

Babanrao Gholap with Sudhakar Badgujar & Leaders.
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

माजी नगरसेवक बंटी तिदमे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यावर लगोलग त्यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांची शिवसेनेने हाकालपट्टी केल्यावर देखील त्यांनी मीच म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेचा अध्यक्ष असल्याचा दावा केला होता. त्यावर संस्थापक, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज रामबाण तोडगा काढला. बडगुजर यांची नियुक्ती केल्याने बडगुजर यांचा सिडकोसह महापालिकेतील दबजबा विचारात घेता तिदमे यांची पुरती कोंडी होणार आहे.

Babanrao Gholap with Sudhakar Badgujar & Leaders.
NCP News: एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्राला धोका दिला

माजी नगरसेवक व नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिंदे सेनेत प्रवेश केला. प्रवेश करताच तिदमे यांच्या गळ्यात महानगरप्रमुख पदाची माळ पडली. तिदमे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेचा अध्यक्ष कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रवेशाच्या दिवशी संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबन घोलप यांनी संघटनेतून तिदमे यांची हकालपट्टी करत सर्व सूत्रे हाती घेतले. मात्र, हकालपट्टीच्या दुसऱ्या दिवशीच तिदमे यांच्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास दाखवत तेच अध्यक्ष असल्याचा दावा केला. पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानंतर एचएलचा अनुभव पाठीशी असल्याने तिदमे यांना शिवाजी सहाणे यांची नाराजी ओढून घेत पदभार दिला. त्यानंतर तिदमे यांनी म्युनिसिपल सेनेचेच शिंदे गटात विलीनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने सेनेचे पदाधिकारी सरसावले. सातपूर विभागात पदाधिकाऱ्यांची मिसळ पार्टी झाली. मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली.

पाचशे पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

तिदमे यांच्या नंतर संघटनेची सूत्रे अनुभवी व्यक्तीच्या हाती द्यावी असा सूर होता संघटनेच्या दोन-चार पदाधिकाऱ्यांनी तिदमे यांना पाठिंबा देत त्यांच्यावर विश्वास दाखवला असला तरी पदाधिकाऱ्यांना जुमानता जवळपास 500 पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पक्षाच्या वरिष्ठांशी संवाद साधून सुधाकर बडगुजर यांच्याकडे संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे द्यावी अशी मागणी केली. बडगुजर यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे व अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दरारा असल्याने त्यांच्याकडेच सूत्रे द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर बडगुजर यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली.

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी व कामगार संघटना शिवसेनेचीच असून, कोणीही बाहेर गेलेला व्यक्ती संघटनेवर दावा सांगू शकत नाही. कर्मचाऱ्यांनादेखील शिवसेनाप्रणीत संघटना हवी आहे. शिवसेनेच्या माध्यमातूनच त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून न्याय देऊ.

- सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com