Sinnar APMC News : वाजे गटामुळे नव्हे गाफील राहिल्याने आमदार कोकाटेंची सत्ता हुकली?

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर बाजार समितीच्या पराभवाची ही आहेत कारणे...
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama

Manikrao Kokate News : सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे आपल्या संचालकांचा गट एकत्र ठेऊ शकले नाही. ज्या पूर्व भागाच्या जोरावर ते राजकारण करायचे, तीथेच पिछेहाट आहे व त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोकाटे यांना राजकीय फेरमांडणी करावी लागेल हा बाजार समिती सभापती निवडणुक निकालाचा संदेश आहे. (Shivsena Ex MLA may be more strong in Sinnar Politics)

सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या निवडणुकीत आज शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे शांतपणे मांडणी करीत टप्प्यात आलेल्या सावजाची शिकार केली. त्यांचे कसब कमी आणि सावजाभोवती हाकारे देणारे त्यांचे सहकारी या विजयाचे मानकरी म्हणता येतील. बाजार समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची सत्ता निसटली. त्याने कोकाटे यांना फारसा फरक पडेल असे नाही. मात्र तो चर्चेचा विषय आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी (ZP) सावधगिरीचा इशारा म्हणता येईल. बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदार, राजकीयव्युहरचना व आणि पाया पाहता वाजे यांना ही निवडणूक तेव्हढी सोपी नव्हती. त्याचे कारण जिल्हा बँकेत सिन्नरचे प्रतिनिधी म्हणून आमदार कोकाटे प्रदिर्घकाळ सत्तेत होते. त्यामुळे सहकारी सोसायटयांवर त्यांचे वर्चस्व होते. स्वतः आमदार असल्याने ग्रामपंचायतींवर देखील त्यांचाच वरचष्मा होता. बाजार समिती त्यांच्याच ताब्यातअसल्याने तुलनेने कोकाटे वरचढ होते.

या निवडणुकीत वाजे गटाने कोकाटे यांच्या आठ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदानासाठी अपात्र ठरवल्या. त्यामुळे निवडणुकीआधीच कोकाटे यांचे ९६ मते कमी झाली. ही मते कमी झाली नसती तर सध्याचा निकाल पाहता कोकाटे यांचे पारडे जड होते. दुसरी घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ ऐनवेळी कोकाटे यांना सोडून वाजे गटात गेले. तिसरी घटना म्हणजे स्वतःच्या सोमठाणे गावातील मतदार दुरावले. तो त्यांचा राजकीय पाया होता. या तीन घटनांमुळे कोकाटे यांना निवडणूक निसटत गेली.

Manikrao Kokate
ACB Nashik News : उपनिबंधक खरेंच्या मालमत्ता पाहून पोलिसही अचंबित !
Manikrao Kokate
Sinnar APMC News: राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटेंचा `करेक्ट` कार्यक्रम केला!

बाजार समितीच्या निवडणुकीत कोकाटे व वाजे दोन्ही गटांना प्रत्येकी ९ जागा मिळाल्या होत्या. त्यात चिठ्ठीचाच पर्याय होता. त्यासाठी अडीच वर्षे सत्ता वाटून घेण्याचा प्रस्ताव होता. वाजे गटाने त्याला प्रतिसाद दिलाच नाही. यावेळी आपले ९ संचालक सांभाळणे महत्त्वाचे होते. परंतु कोकाटे समर्थक गाफील राहिल्याचे दिसते.

शिवसेनेचे दिपक खुळे यांनी पाच दिवस आधीच महिला संचालक सिंधुताई कोकाटे यांनी अज्ञातस्थळी हलवले. नंतर त्यांना आमदार कोकाटे यांची बधु भारत कोकाटे, संदीप ढोक यांची मदत झाली. या सर्वांनी फोन स्वीच ऑफ करुन वाजे यांची बाजू भक्कम केली. विशेषः म्हणजे प्रारंभी वाजे गटात गेलेल्या महिला संचालकांचे पती कोकाटे गटासोबत तर संचालीका घरी. त्यात दगाफटका होऊ शकतो असा विचारही कोणी केला नाही. या गोष्टी कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियंत्रणात ठेवायला हव्या होत्या. तसे घडले नाही.

Manikrao Kokate
Jalgaon Crime News : आला...रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला

आज झालेल्या निवडणुकीत प्रचंड तणाव होता. त्यामुळे निवडणूकीची सभा तहकूब करण्याचा प्रयत्न होता. कोकाटे गटाच्या संचालकांनी वाजे गटात गेल्लाय सिंधुताई कोकाटे यांच्यावर खुप दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वादावादी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी ठाम राहिल्या. त्यापेक्षाही अधिक ठाम श्रीमती कोकाटे राहील्या. त्या सर्वांना पुरून उरले. या सर्व प्रकारात कोकाटे गटाचा सभापतीपदाचा उमेदवार कोण?, धोरण काय याचा स्पष्ट संदेश नसल्याने आजचा गोंधळ झाल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com