Sinnar APMC Election: आमदार कोकाटेंच्या राजकीय वारसदाराचे मार्केटींग!

Sinnar Bazar Samiti Election: बाजार समितीच्या निवडणुकीत ठरणार विधानसभेची गणिते
Rajabhau Waje & Manikrao Kokate
Rajabhau Waje & Manikrao KokateSarkarnama

Sinnar APMC News: सिन्नर बाजार समितीची निवडणूक अतिशय बोलकी आहे. सोसायटी गटात कोकाटे तर ग्रामपंचायत गटात वाजे गट प्रभावी आहे. आता आज होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाच्या प्रभावावर निकाल ठरेल. एकंदरच ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम आहे. त्यात आमदार माणिकराव कोकाटेंचा प्रभावी राजकीय वारसदार कोण? यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. (Sinner APMC election is a trial of Assembly election campaign)

सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. त्यादृष्टीने नेत्यांचे धृवीकरण झाले आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Pimpalgaon APMC : बाजार समिती जिंकेल तो आमदार होणार?

या बाजार समितीच्या निवडणुकीत आज जो अंडरकरंट आहे, त्याचा विचार केल्यास सोसायटी अर्थात सहकारातील सिलेक्टीव्ह मतदारांवर आमदार कोकाटेंचा पगडा आहे. सर्वसामान्य अर्थात गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायत गटातील मतदारांचा कल माजी आमदार वाजे यांच्याकडे जाणवतो. त्याचे प्रतिबिंब नुकत्याच झालेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दिसले. त्यात कोकाटे गटाला सात तर वाजे गटाला सहा जागा मिळाल्या होत्या. बाजार समिती हे तालुका कार्यक्षेत्र असलेले त्याचे प्रतिबिंब म्हणता येईल.

माजी जिल्हा परिषद सदस्य सिमांतीनी कोकाटे या आमदार कोकाटे यांच्या कन्या त्यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. सध्या मतदारसंघात कार्यकर्ते मतदारांशी संपर्क ठेवण्यात त्या आघाडीवर आहेत. दुसरीकडे कालपर्यंत आमदार कोकाटे यांची निवडणूक यंत्रणा हाताळणारे त्यांचे बंधु भरत कोकाटे मतभेदांमुळे सध्या कोकाटे यांच्यापासून दूर आहेत. ते वाजे गटाबरोबर आहेत. त्यामुळे कोकाटे यांचे पॅनेल जिंकले तर त्याचे श्रेय सिमांतीनी कोकाटे यांना जाईल. पराभूत झाले तर त्यात भारत कोकाटे यांचे शहा गटातील डावपेच असतील. त्यात कोकाटे यांचे राजकीय वारसदार कोण? असा विचार काही मतदार करताना दिसतात.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Chhagan Bhujbal News : जिल्हा बँक कुणी बुडविली हे सर्वांना माहित आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत कोकाटे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राजेंद्र चव्हाणके ही प्रमुख मंडळी आहेत. स्वतः कोकाटे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सहकार गटातील मतदारांच्या नियोजनात मास्टर आहेत. माजी आमदार वाजे यांच्याबरोबर उदय सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, निलेश केदार, बंडू नाना भाबड, दिपक खुळे हे नेते आहेत. या प्रत्येकाना निवडणूक जिंकायचीच या चुरशीने व्युहरचना केली आहे. यानंतर जिल्हा परिषद व थेट विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे दिसायला बाजार समिती मात्र प्रत्यक्ष रंगीत तालीम विधानसभेची अशी स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in