अनिल कदम म्हणतात, आमच्या ओझरच्या समस्या सोडवा!

ओझर नगरपरिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्याशी विविध समस्यांबाबत माजी आमदार अनिल कदम यांनी चर्चा केली.
Anil Kadam & Ozar CEO
Anil Kadam & Ozar CEOSarkarnama

ओझर : शहरातील (Ozar) नागरिकांना अनेक मूलभूत नागरी सुविधांअभावी (Civic issues) हाल सोसावे लागत आहेत. या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी नवनियुक्त मुख्याधिकारी किरण देशमुख (CEO Kiran Deshmukh) यांना विविध सूचना केल्या. ओझर नगरपरिषद कार्यालयात विविध समस्यांसंदर्भात बैठक घेऊन समस्या तातडीने मार्गी लावाव्यात असे त्यांनी सांगितले.

Anil Kadam & Ozar CEO
बच्चू कडूंचा घरचा आहेर, महापोर्टल नको, `एमपीएससी` हवी!

गेल्या अनेक दिवसांपासून ओझर शहरवासीयांना मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. यात प्रामुख्याने जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, अनियमित, अपुरा व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, घंटागाडी, सर्वच रस्त्यावर पडलेले खड्डे, पथदीप आदी प्रमुख विषय आठ दिवसांत मार्गी लावण्यासाठी कदम यांनी सूचना केल्या. पाणीपुरवठा संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन नियोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

Anil Kadam & Ozar CEO
राज ठाकरेंना विरोध नको, अयोध्येला येऊ द्या!

घनकचरा, रस्त्यावर पडलेले खड्डे, प्रस्तावित विकासकामे करण्यावर भर द्यावा, यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्‍न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे कदम यांनी सांगितले. सुनील कदम, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश महाले, विभागप्रमुख प्रशांत पगार, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पगार, शहरप्रमुख नितीन काळे, युवासेना तालुकाप्रमुख आशिष शिंदे, स्वप्निल कदम, महेश शेजवळ, नरेंद्र थोरात, अनिल सोमासे, अनंत सरोदे, प्रमोद सोनवणे आदींसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ओझर क्रेडाईचे अध्यक्ष बापू जाधव, प्रशांत शेळके, राहुल देशमुख, प्रकाश रकिबे, अभिजित गायकवाड आदी उपस्थित होते.

आमदारांकडून घेतली माहिती

बैठकीदरम्यान ओझरमधील प्रस्तावित असलेल्या काही रस्ते व विकास कामांसंदर्भात माजी आमदार अनिल कदम यांनी आमदार दिलीप बनकर यांच्याकडून फोनद्वारे माहिती घेतली. प्रस्तावित असलेल्या एकाच कामांसाठी दोनदा शासनासोबत पत्रव्यवहार होऊ नये, अन्य ठिकाणी निधीचा वापर व्हावा यासाठी माहिती घेतल्याचे कदम यांनी सांगितले.

---

विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे, न्यायालयीन प्रक्रियेनंतर ओझर नगरपरिषद अस्तित्वात आली. कचरा, रस्ते, वीज हे मोठे प्रश्न असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्वच समस्या येत्या आठ दिवसांत सोडवण्याचा प्रयत्न करणार. रस्त्यांबाबत विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्याशी देखील चर्चा केली असून येत्या काळात सर्वच समस्या सोडवू.

- अनिल कदम, माजी आमदार, निफाड.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com